Duleep Trophy 2025, Kolhapur’s Mahesh Patil Appointed As Strength And Conditioning Fitness Coach West Zone Team : बीसीसीआय अंतर्गत घेण्यात येणाऱ्या चारदिवसीय दुलीप ट्राॅफी या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी खेळाडू महेश पाटील यांची पश्चिम विभाग (West Zone ) संघाच्या फिटनेस ट्रेनर ( Strength And Conditioning Fitness Coach ) या पदावर निवड झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शार्दुल ठाकूरसह अय्यरच्या संघाला कोल्हापूरकर देणार फिटनेसचे धडे
दुलीप ट्रॉफी या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत देशातील पूर्व विभाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग, दक्षिण विभाग, मध्य विभाग व उत्तर पूर्व विभाग या सहा विभागीय संघाचा समावेश आहे. भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलसह टीम इंडियातील अनेक स्टार चेहरे या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत कोल्हापूरकर महेश पाटील हे लॉर्ड शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील संघाला फिटनेसचे धडे देताना दिसणार आहे. या संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि ऋतुराज गायकवाड या टीम इंडियातील स्टार खेळाडूंचा समावेश आहे.
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
कोण आहेत महेश पाटील?
या स्पर्धेतील पश्चिम विभाग संघाच्या फिटनेस ट्रेनर (स्ट्रेंथ ॲण्ड कंडिशन फिटनेस प्रशिक्षक) म्हणून महेश पाटील यांना काम करण्याची प्रथमच संधी मिळाली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ते माजी खेळाडू असून, गेली दोन वर्षे महाराष्ट्र रणजी ट्राॅफी संघाच्या सपोर्ट स्टाफ आहेत.
या खेळाडूंनाही दिलं आहे फिटनेस ट्रेनिंग
महेश पाटील यांनी प्रशिक्षित केलेल्या लोकप्रिय खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाचे प्रतिनीधीत्व केलेल्या केदार जाधवसह IPL मध्ये चेन्नूई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या मुकेश चौधरीचाही समावेश होतो. याशिवाय टेनिसपटू रुतुजा भोसले या महिला खेळाडूचेही ते फिटनेस ट्रेनर राहिले आहेत.
Web Title: Kolhapur’s Mahesh Patil Appointed As Strength And Conditioning Fitness Coach Duleep Trophy Shardul Thakur And Shreyas Iyer West Zone Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.