IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) सोडून दिलेल्या सामन्यात राहुल चहरनं ( Rahul Chahar) चुरस निर्माण केली. चहरनं Kolkata Knight Riders च्या चार फलंदाजांना माघारी पाठवून MIच्या ताफ्यात विजयाची आस निर्माण केली. पण, कृणाल पांड्यानं KKRचा फॉर्मात असलेला खेळाडू आंद्रे रसेलचा शून्यावर झेल सोडला अन् तिथे पुन्हा MIच्या हातातू मॅच गेली होती. कृणालच्या पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहनं रसेलला आणखी एक जीवदान दिलं. तरीही सामना अत्यंत रंगतदार झाला. कृणाल व जसप्रीत यांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करताना KKRच्या डगआऊटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले. ट्रेंट बोल्टनं अखेरच्या षटकात रसेलची विकेट घेत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  कोलकाताला विजयासाठी ३६ चेंडूंत ४० धावांची गरज होती. पण, मुंबईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना संघाला १० धावांनी विजय मिळवून दिला. Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार 
 ipl 2021 t20 MI Vs KKR live match score updates chennai 

नितीश राणा व शुबमन गिल यांची धमाकेदार सुरूवात
KKRच्या गोलंदाजांनी साजेशी कामगिरी केल्यानंतर फलंदाजांकडूनही त्यांना तशीच साथ मिळाली. नितीश राणा व शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. राहुल चहरनं ही भागीदारी संपुष्टात आणली. शुबमन गिल २४ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारांसह ३३ धावांवर माघारी परतला. राहुल त्रिपाठी ( ५) यालाही चहरनं बाद केले. त्यानंतर चहरनं KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गनची विकेटही घेतली. पण, एका बाजूनं नितीश राणा खिंड लढवत होता. चहरच्या चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नितीशनं पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. क्विंटन डी कॉकनं त्याला यष्टिचीत केलं. नितीशनं ४७ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या, राहुल चहरनं २७ धावांत चार विकेट्स घेतल्या. IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत घेतल्या पाच विकेट्स; MIनं अखेरच्या पाच षटकांत गमावले ७ फलंदाज

चुरशीच्या क्षणात आंद्रे रसेलला दोन जीवदान 
KKRच्या विकेट्स पडण्याचे सत्र कायम राहिले. कृणाल पांड्यानं KKRच्या शाकिब अल हसनला ( ९) माघारी पाठवले. त्याच षटकात कृणालनं स्वतःच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलचा झेल सोडला. रसेलनं तेव्हा खातंही उघडलं नव्हतं. त्यानंतर ५ धावांवर असताना बुमराहनं त्याचा झेल सोडला. सामन्यातील रंगत अखेरच्या षटकापर्यंत कायम राहिली. कृणालनं १८व्या षटकात फक्त ३ धावा देताना सोडलेल्या झेलची भरपाई केली. बुमराहनंही १९व्या षटकात ४ धावा दिल्या आणि KKRला विजयासाठी ६ चेंडूंत १५ धावा हव्या होत्या. ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकांत पहिल्या दोन चेंडूंत दोन धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर बोल्टनं रसेलला बाद केलं. पुढच्याच चेंडूवर त्यानं पॅट कमिन्सचा त्रिफळा उडवला. कोलकाताला ७ बाद १४२ धावाच करता आल्या. मुंबईनं १० धावांनी हा सामना जिंकला.  IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score WHAT A SHOT!; सूर्याकुमार यादवचा उत्तुंग षटकार, हार्दिक पांड्या झाला स्तब्ध, Video 

 

सूर्या-रोहित जोडीनं डाव सावरला, पण...
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. Kolkata Knight Riders च्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. रोहितचा आजचा खेळ फार संथ वाटला. त्यात हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, इशान शर्मा यांच्याकडूनही अपेक्षित कामगिरी न झाल्यानं MI ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत ५ विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले. मुंबईनं अखेरच्या पाच षटकांत ७ विकेट्स गमावल्या.MI Vs KKR, MI Vs KKR live score, IPL 2021, IPL 2021 latest news,  SA vs PAK : अशी विचित्र फिल्डींग पाकिस्तानी खेळाडूच करू शकतात, Video पाहून व्हाल लोटपोट

रसेल मेनिया...
IPL 2021मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला ( २) फार कमाल दाखवता आली नाही. वरूण चक्रवर्थीनं दुसऱ्याच षटकात त्याला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) जराही दडपण न घेता आक्रमक खेळ केला. सूर्या व रोहित शर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार  व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. रोहितनं ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. कमिन्सनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांवर गडगडला.MI Vs KKR IPL Matches, MI Vs KKR IPL match 2021, MI Vs KKR T20 Match, MI Vs KKR Live Score

English summary :
Mumbai Indians defeats KKR by 10 runs, what a comeback by MI in the match. At one stage there were no hopes of win for them when just run a ball was required, but MI loves to dominate KKR.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : BLOCKBUSTER performance from Trent Boult in the final over, Mumbai Indians won by 10 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.