SA vs PAK : अशी विचित्र फिल्डींग पाकिस्तानी खेळाडूच करू शकतात, Video पाहून व्हाल लोटपोट

क्षेत्ररक्षणात पाकिस्तानी खेळाडूंकडून हास्यास्पद चूका होणे, काही नवीन गोष्ट नाही. त्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सहज सापडतील. त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 05:24 PM2021-04-13T17:24:07+5:302021-04-13T17:24:33+5:30

whatsapp join usJoin us
South Africa vs Pakistan: Sharjeel Khan hilariously misjudges a catch in 2nd T20I, Watch Video | SA vs PAK : अशी विचित्र फिल्डींग पाकिस्तानी खेळाडूच करू शकतात, Video पाहून व्हाल लोटपोट

SA vs PAK : अशी विचित्र फिल्डींग पाकिस्तानी खेळाडूच करू शकतात, Video पाहून व्हाल लोटपोट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्षेत्ररक्षणात पाकिस्तानी खेळाडूंकडून हास्यास्पद चूका होणे, काही नवीन गोष्ट नाही. त्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सहज सापडतील. त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातील पाकिस्तानी खेळाडू शरजील खान याची फिल्डिंग पाहून सध्या सर्व लोटपोट झाले आहेत.  चार वर्षानंतर शरजील पाकिस्तानी संघात पतरला आणि त्यानं स्वतःचं हसू करून घेतलं.

तंदुरूस्तीच्या कारणावरून शरजीलवर टीका होत होती, त्यात आता क्षेत्ररक्षणातील या चुकीमुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. जोहान्सबर्ग येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात १३व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आफ्रिकेच्या जॉर्ज लिंडेनं उत्तुंग फटका मारला. उस्मान कादीरनं टाकलेल्या गुगली चेंडूवर लिंडेचा फटका चुकला आणि तो झेलबाद झाला असता. पण, लाँग ऑनला उभ्या असलेल्या शरजीलला चेंडू दिसलाच नाही आणि तो पुढे धावत सुटला. चेंडू त्याच्या मागे पडला.  नाव बदललं, जर्सी बदलली, तरीही हा संघ हार्ट अटॅक देण्याचं काही थांबवत नाही; प्रीती झिंटा नाराज

पाहा व्हिडीओ.. 


दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ने बरोबरी
दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानंवर ६ विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानला ९ बाद १४० धावाच असता आल्या.  कर्णधार बाबर आझमनं ५० धावांची खेळी केली, परंतु अन्य फलंदाज अपयशी ठरले. लिंडेनं २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेनं सलामीवर एडन मार्करामच्या ५४ धावांच्या जोरावर हे लक्ष्य सहज पार केले. 

Web Title: South Africa vs Pakistan: Sharjeel Khan hilariously misjudges a catch in 2nd T20I, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.