Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार

आयपीएलच्या १४व्या पर्वाला दुखापतीचे ग्रहण लागण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्याला मुकलेला असताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 09:59 PM2021-04-13T21:59:24+5:302021-04-13T22:49:46+5:30

whatsapp join usJoin us
Big Breaking : Ben Stokes injury, England star ruled out of IPL with suspected broken hand, Big Blow for RR | Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार

Big Breaking : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, बोट तुटल्यामुळे मोठ्या खेळाडूची IPL 2021 मधून माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलच्या १४व्या पर्वाला दुखापतीचे ग्रहण लागण्यास सुरूवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा प्रमुख गोलंदाज जोफ्रा आर्चर हा दुखापतीमुळे आयपीएलच्या सामन्याला मुकलेला असताना आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचे दुःख विसरतोय तोच त्यांच्यासाठी वाईट बातमी आली. संघातील अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) यानं आयपीएलमधून माघार घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.  पंजाबविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलची कॅच घेताना त्याला ही दुखापत झाली आणि त्याचं बोट तुटल्याची माहिती  RR ने दिली. तो आयपीएलच्या फायनलपर्यंत संघासोबतच राहणार आहे.  



संजू सॅमसनच्या शतकानंतरही राजस्थान रॉयल्स पराभूत
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील आतापर्यंतचा सर्वात थरारक सामना म्हणून राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स ( Rajasthan Royals vs Punjab Kings) याची नोंद होईल. लोकेश राहुल ( KL Rahul), दीपक हुडा ( Deepak Hooda) आणि ख्रिस गेल ( Chris Gayle ) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पंजाब किंग्सनं ( PBKS) २२१ धावांचा डोंगर उभा केला. पण, राजस्थान रॉयल्सचा ( RR) नवा कर्णधार संजू सॅमसन ( Sanju Samson) एकटा भिडला आणि ११९ धावांची खेळी करून कडवी टक्कर दिली. पंजाबनं हा सामना अवघ्या ४ धावांनी जिंकला. लोकेश राहुलनं ५० चेंडूंत ९१ धावा, दीपक हुडानं २८ चेंडूंत ६४ धावा आणि गेलनं ४० धावा केल्या. पंजाबनं ६ बाद २२१ धावा केल्या. प्रत्युत्तरात RRच्या संजू सॅमसननं ६३ चेंडूंत १२ चौकार व ७ षटकार खेचून ११९ धावांची खेळी केली, परंतु RRला ७ बाद २१७ धावांपर्यंत मजल मारता आली. सॅमसन वगळता RRच्या एकाही फलंदाजाला ३० धावांचा पल्ला ओलांडता आला नाही.

Web Title: Big Breaking : Ben Stokes injury, England star ruled out of IPL with suspected broken hand, Big Blow for RR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.