IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत घेतल्या पाच विकेट्स; MIनं अखेरच्या पाच षटकांत गमावले ७ फलंदाज

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 09:18 PM2021-04-13T21:18:51+5:302021-04-13T21:22:19+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : Andre Russell has picked 5 wickets in 12 balls, MI all out on 152  | IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत घेतल्या पाच विकेट्स; MIनं अखेरच्या पाच षटकांत गमावले ७ फलंदाज

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : आंद्रे रसेलनं १२ चेंडूंत घेतल्या पाच विकेट्स; MIनं अखेरच्या पाच षटकांत गमावले ७ फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) व रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांची फटकेबाजी वगळता Mumbai Indiansच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. Kolkata Knight Riders च्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. रोहितचा आजचा खेळ फार संथ वाटला. त्यात हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, इशान शर्मा यांच्याकडूनही अपेक्षित कामगिरी न झाल्यानं MI ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आंद्रे रसेलनं १० चेंडूंत ४ विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले.  IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update

IPL 2021मधील पहिलाच सामना खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकला ( २) फार कमाल दाखवता आली नाही. वरूण चक्रवर्थीनं दुसऱ्याच षटकात त्याला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) जराही दडपण न घेता आक्रमक खेळ केला. रोहित थोडासा संथ खेळत होता, तेच दुसरीकडे सूर्याची बॅट तुफान फटकेबाजी करत होता. रोहित-सूर्या जोडीनं ३८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १०व्या षटकात पॅट कमिन्सच्या पाचव्या चेंडूवर सूर्यानं मारलेला षटकार स्टेडियमपार केला. सूर्यानं या षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याचा ९९ मीटरचा हा फटका पाहून डगआऊटमध्ये बसलेला हार्दिक पाड्याही अवाक् झाला.  WHAT A SHOT!; सूर्याकुमार यादवचा उत्तुंग षटकार, हार्दिक पांड्या झाला स्तब्ध, Video 

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार  व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. त्यानंतर इशान किशन ( १) हाही लगेच माघारी परतला. मुंबई इंडियन्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर सूर्याचे हे ७वे अर्धशतक ठरले आणि त्यानं रोहितचा ६ अर्धशतकांचा विक्रम मोडला. अंबाती रायुडू ८ अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहे. सूर्या माघारी परतल्यानंतर रोहितनं गिअर बदलला व फटकेबाजी सुरू केली. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत त्यानं तिसरे स्थान पटकावले. विराट कोहली - ५९११, सुरेश रैना  -५४२२ यांच्यानंतर रोहितचा ५२८४ क्रमांक येतो. त्यानं शिखर धवनला ( ५२८२) मागे टाकले. ipl 2021 t20 MI Vs KKR live match score updates chennai

पॅट कमिन्सनं १६व्या षटकात रोहितला बाद केले. कमिन्सनं टाकलेला चेंडू रोहितच्या बॅटची कड घेऊन यष्टिंवर आदळला. रोहितनं ३२ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. कमिन्सनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. आज हार्दिक पांड्याना फटकेबाजी करण्यासाठी अधिक वेळ मिळाला होता, पंरतु तो १५ धावांवर ( २ चौकार) माघारी परतला. किरॉन पोलार्ड vs आंद्रे रसेल या कॅरेबिनय लढाईत KKRच्या रसेलनं बाजी मारली. अखेरच्या पाच षटकांत MIनं सात विकेट गमावल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १५२ धावांवर गडगडला. रसेलनं १५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update

Web Title: IPL 2021 MI Vs KKR Live T20 Score : Andre Russell has picked 5 wickets in 12 balls, MI all out on 152 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.