इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) सर्वाधिक चार जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवा भिडू आला आहे. आयपीएलच्या 2020साठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबरला कोलकाता येथे पार पडणार आहे. पण, तत्पूर्वी सहभागी संघ खेळाडूंची अदलाबदल करत आहेत आणि आज मुंबई इंडियन्सच्या जाळ्यात महत्त्वाचा खेळाडू लागला आहे. शिवाय राजस्थान रॉयल्सनेही एका युवा खेळाडूला आपल्या चमून दाखल करून घेतले आहे.

मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी दमदार झाली आहे. त्यामुळे 2020च्या मोसमातही तेच जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी आज न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांनी बोल्टला संघात घेतले. बोल्टनं 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2018 व 2019मध्ये त्यानं दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले. त्यानं 33 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.


दुसरीकडे राजस्थान रॉयल्सनं अंकित रजपूतला आपल्या संघात घेतले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबकडून त्यांनी राजपूतला घेतले. रजपूतनं 2018च्या हंगामात 23 सामन्यांत 22 विकेट्स घेतल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतील त्रिपुरा विरुद्ध उत्तर प्रदेश या सामन्यात रजपूतनं विक्रम केला. 


उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंकित रजपूतनं हा विक्रम केला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 6-6 षटकांचा खेळवण्यात आला. त्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या त्रिपुराला 6 बाद 49 धावा करता आल्या. यापैकी पाच विकेट्स या अंकितनं घेतल्या. त्यानं 2 षटकांत 17 धावा देत 5 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशनं 5.2 षटकांत 3 विकेटच्या गमावत 50 धावा करून सामना जिंकला.

Kings XI Punjabच्या गोलंदाजाचा ट्वेंटी-20 पराक्रम; एकाही भारतीयाला जमला नाही 'हा' विक्रम

IPL 2020 : केदार जाधवसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना मिळणार डच्चू? लिलावात रंगणार चुरस

IPL 2020 : आर अश्विन झाला दिल्लीकर; पंजाबला दिली 'एवढी' रक्कम अन् एक खेळाडू...

IPLचा उद्घाटन सोहळा म्हणजे पैशांचा अपव्यय; 2020 च्या लीगसाठी मोठा निर्णय

Web Title: IPL 2020: Trent Boult will play for Mumbai Indians in the upcoming season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.