भारतीय संघाचा ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज दीपक चहरनं तीन दिवसांतील दुसरी हॅटट्रिक नोंदवून विक्रम केला.  सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना चहरनं हा पराक्रम केला. त्यानं विदर्भ संघाविरुद्ध 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या आणि त्यात हॅटट्रिकचा समावेश आहे. पण, त्याच्या या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाजानं केली आणि हा विक्रम करताना त्यानं एकाही भारतीय गोलंदाजांना न जमलेला पराक्रम नावावर केला.

सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतील त्रिपुरा विरुद्ध उत्तर प्रदेश या सामन्यात हा विक्रम झाला. उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंकित रजपूतनं हा विक्रम केला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 6-6 षटकांचा खेळवण्यात आला. त्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या त्रिपुराला 6 बाद 49 धावा करता आल्या. यापैकी पाच विकेट्स या अंकितनं घेतल्या. त्यानं 2 षटकांत 17 धावा देत 5 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशनं 5.2 षटकांत 3 विकेटच्या गमावत 50 धावा करून सामना जिंकला.

अंकितनं या सामन्यात पाच विकेट्स घेत एक विक्रम केला. एकाही भारतीय दिग्गजाला न जमलेला विक्रम केला. ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये तीन वेळा पाच विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्यानं 2017 मध्ये राजस्थानविरुद्ध 4 षटकांत 20 धावांत 5, तर 2018मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 4 षटकांत 14 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

या विक्रमात श्रीलंकेचा लसिथ मलिंगा ( 5 वेळा) अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड विसे ( 4), बांगलादेशचा शकिब अल हसन ( 4) यांचा क्रमांक येतो. अंकितनं 56 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 189 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 48 आणि ट्वेंटी-20त 92 विकेट्स आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यानं चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

Web Title: Kings XI Punjab Ankit Rajpoot's becrome a first Indian to take three 5-fers in the T20 formatauls in Twenty20 cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.