R Ashwin completes switch from KXIP to DC in 1.5 crore plus J Suchith deal ahead of IPL 2020 Auction | IPL 2020 : आर अश्विन झाला दिल्लीकर; पंजाबला दिली 'एवढी' रक्कम अन् एक खेळाडू...
IPL 2020 : आर अश्विन झाला दिल्लीकर; पंजाबला दिली 'एवढी' रक्कम अन् एक खेळाडू...

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) पुढीम हंगमात आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. शुक्रवारी दिल्ली आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांत ट्रेड झाली आणि त्यानुसार दिल्लीनं अश्विनसाठी 1.5 कोटी रुपये मोजले आहेत आणि डावखुरा फिरकीपटू जगदीशा सुचिथ याला पंजाबला दिले आहे. 33 वर्षीय अश्विनला मागील लिलावात 7.6 कोटी मिळाले होते आणि त्याला दिल्लीकडून तितक्याच रकमेची अपेक्षा आहे.

याआधीच्या चर्चेनुसार अश्विनसाठी दिल्ली दोन खेळाडू पंजाबला देण्यास तयार होते. त्यात न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट याचे नाव होते, परंतु दिल्लीला पंजाबला केवळ सुचिथ द्यावा लागला. ''या डीलमुळे प्रत्येक जण आनंदी आहे. अश्विनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,'' असे मत पंजाबचे सहमालक नेस वाडीया यांनी व्यक्त केले.  दिल्ली कॅपिटल्सने मोठ्या थाटात अश्विनचे स्वागत केले आहे.


अश्विनच्या जाण्याने आगामी मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधारपद भारतीय संघाचा सलामी फलंदाज केएल राहुलकडे दिले जाऊ शकते. केएल राहुल गेले दोन हंगाम पंजाब संघासोबत आहे. गेल्या हंगामात केएल राहुलने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे पंजाब संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे सोपविण्यात येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Web Title: R Ashwin completes switch from KXIP to DC in 1.5 crore plus J Suchith deal ahead of IPL 2020 Auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.