ठळक मुद्देमलिंगाची उणीव कोण भरून काढणार?CSKचा सामना करण्यापूर्वी रोहित शर्मानं साधला संवादमुंबई इंडियन्सची यूएईतील कामगिरी निराशाजनक, पण रोहित म्हणतो
गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात Indian Premier Leauge 2020चा सलामीचा सामना होणार आहे. इतर पर्वाप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स ( MI) जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. रोहित शर्मानं ( Rohit Sharma) सरावात टोलावलेला उत्तुंग षटकार चक्क मैदानाबाहेरून जाणाऱ्या बसच्या छतावर पडला होता. त्याच्या फटकेबाजीचा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला होता. IPL 2020च्या पहिल्या सामन्याला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत आणि रोहितनं MI फॅन्ससाठी मोठी बातमी दिली आहे.
IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सचं पारडं जड, पण चेन्नई सुपर किंग्सचे हे विक्रम मोडणे अशक्यच
मुंबई इंडियन्स हा IPLमधील सर्वात यशस्वी संघ आहे. MI ने 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये IPLचे जेतेपद नावावर केले. UAEतही मुंबई इंडियन्सही फेव्हरिट मानले जात आहे. पण, UAEतील इतिहास मुंबई इंडियन्सच्या विरोधात आहे. मुंबई इंडियन्सनं येथे खेळलेल्या पाच सामन्यांत एकही विजय मिळवलेला नाही. पण, Past is Past असे सांगून रोहितनं IPL 2020चा खास प्लान उलगडला. CSKचा सामना करण्यापूर्वी रोहित शर्मानं व्हिडीओ कॉन्फरन्सींद्वारे भारतीय मीडियाशी संवाद साधला. त्यात त्यानं अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.
IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!
यापूर्वी 2014मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा यूएईत पार पडला होता. 2009मध्ये आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण आयपीएल भारताबाहेर होण्याची ही पहिली वेळ आहे. 2014मध्ये झालेल्या आयपीएलचे एकूण 20 सामने यूएईत झाले होते. त्यापैकी 7 सामने अबु धाबी, 6 सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आणि 7 सामने दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाले होते. मुंबई इंडियन्सना यूएईत झालेल्या पाचही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. किंग्स इलेव्हन पंजाबनं सर्वच्या सर्व पाचही सामने जिंकले आहेत.
त्याविषयी रोहित म्हणाला,'' तो इतिहास झाला.. माझ्यामध्ये 2014च्या त्या सामन्यांतील केवळ तीनच खेळाडू ( मी, किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह) सध्या संघात आहे. 2020चा संघ हा संपूर्ण नवा आहे, सपोर्ट स्टाफही नवा आहे. त्यामुळे आधी काय घडलं, याचा विचार करत नाही. 6 वर्षांत संघात बरेच काही बदल झाले आहेत. येथील परिस्थितीशी जुळवून घेणं महत्त्वाचे आहे.''
UAE तील अऩ्य संघांची कामगिरीकिंग्स इलेव्हन पंजाब - 5 सामने , 5 विजय
चेन्नई सुपर किंग्स - 5 सामने, 4 विजय, 1 पराभव
राजस्थान रॉयल्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभव
कोलकाता नाईट रायडर्स - 4 सामने, 2 विजय, 2 पराभव
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
सनरायझर्स हैदराबाद - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
दिल्ली डेअरडेव्हिल्स - 5 सामने, 2 विजय, 3 पराभव
मुंबई इंडियन्स - 5 सामने, 5 पराभव
मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!
मलिंगाची उणीव कोण भरून काढणार?
''लसिथ मलिंगाचे नसणे, हे संघाची चिंता वाढवणारी गोष्ट नक्कीच आहे. त्याची उणीव भरून काढणे अवघड आहे. तो मुंबई इंडियन्सचा मॅच विनर खेळाडू आहे. मुंबई इंडियन्स जेव्हा जेव्हा संकटात होता, तेव्हा मलिंगा धावून आला. त्याची जागा भरून काढता येण्यासारखी नक्कीच नाही. आमच्याकडे नॅथन कोल्टर नील, धवल कुलकर्णी आदी पर्याय आहेत,''असेही तो म्हणाला.
काय आहे Big News?
2019मध्ये मुंबई इंडियन्सनं भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला करारबद्ध केलं होतं आणि त्याला मधल्या फळीत जागा मिळावी यासाठी रोहितनं सलामीला येण्याचा निर्णय घेतला होता. रोहित मागच्या मोसमात सलामीला खेळला होता आणि त्यानं 15 सामन्यांत 405 धावा केल्या होत्या. पण, यंदा ख्रिस लीनचा समावेश झाल्यानं रोहित पुन्हा मधल्या फळीत खेळेल का? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता.
रोहितनं एका वाक्यात त्याचे उत्तर दिले... तो म्हणाला, याही वर्षी मी सलामीला खेळणार आहे.
पाहा व्हिडीओ...
जाणून घ्या मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक ( Mumbai Indians Schedule, IPL 2020 )
19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
23 सप्टेंबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
1 ऑक्टोबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
4 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वाजल्यापासून, शारजाह
6 ऑक्टोबर, मंगळवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
11 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
16 ऑक्टोबर, शुक्रवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
18 ऑक्टोबर, रविवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
25 ऑक्टोबर, रविवार - राजस्थान ऱॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
3 नोव्हेंबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह
मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians Team for IPL 2020)
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.