ICC Women's T20I Rankings : टीम इंडियाच्या ओपनरने तीन दिवसांत अव्वल स्थान गमावले

ICC Women's T20I Rankings : गोलंदाजांमध्येही बसला फटका...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:50 PM2020-03-09T13:50:58+5:302020-03-09T13:57:59+5:30

whatsapp join usJoin us
Beth Mooney to the top of the ICC Women's T20I Rankings for batters, Shafali Verma lost first place svg | ICC Women's T20I Rankings : टीम इंडियाच्या ओपनरने तीन दिवसांत अव्वल स्थान गमावले

ICC Women's T20I Rankings : टीम इंडियाच्या ओपनरने तीन दिवसांत अव्वल स्थान गमावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियन महिला संघानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्यांदा बाजी मारली. ऑस्ट्रेलियानं अंतिम लढतीत भारतीय महिला संघावर ८५ धावांनी विजय मिळवला. अंतिम फेरीतील निराशाजनक कामगिरीचा टीम इंडियाला आयसीसी ट्वेंटी-20 क्रमवारीत फटका बसला. मागील आठवड्यात अव्वल स्थानी विराजमान होणाऱ्या १६ वर्षीय शेफाली वर्माची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. अंतिम सामन्यात नाबाद ७८ धावा करणाऱ्या बेथ मूनीनं अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. 

अ‍ॅलिसा हिली ( ७५) आणि बेथ मूनी ( ७८*) यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना १८५ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात भारतीय महिलांना दडपणाखाली चांगला खेळ करता आला नाही आणि भारताचे सर्व फलंदाज ९९ धावांत तंबूत परतले. ऑस्ट्रेलियानं २०१०, २०१२, २०१४, २०१८ आणि २०२० असा पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला. अ‍ॅलिसा हिलीला सामन्यातील, तर बेथ मूनीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.  

उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर शेफालीनं ट्वेंटी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. केवळ १८ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या शेफालीने हे स्थान पटकावून इतिहास घडवला होता. भारताची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर अव्वल स्थान पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. पण, तिचे हे अव्वल स्थान तीन दिवसच टिकले. 

बेथ मूनी २ स्थानांच्या सुधारणेसह ७६२ गुणांची कमाई करून टॉपवर पोहोचली आहे. मूनीनं संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक २५९ धावा केल्या आहेत. शेफालीला फायनलमध्ये केवळ दोन धावा करता आल्या आणि तिला १७ गुणांचे नुकसान सोसावे लागले. ती आता ७४४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. भारताची स्मृती मानधनाही एक स्थानाच्या घसरणीसह सातव्या क्रमांकावर गेली आहे. तिच्या खात्यात ६९४ गुण आहेत.


गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेस जोनासेन अव्वल पाचात आली आहे, तर दीप्ती शर्माची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. 

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट!

 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात दोनच भारतीय, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व!

 ...तर स्टार्कला एका सेकंदात 'जोरू का गुलाम' ठरवलं असतं, सानिया मिर्झाचा खोचक टोमणा

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video

टीम इंडियात पुनरागमन? MS Dhoniसाठी अटी अन् शर्ती कायम, BCCIकडून स्पष्ट संकेत

Web Title: Beth Mooney to the top of the ICC Women's T20I Rankings for batters, Shafali Verma lost first place svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.