Corona Virus : IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट!

Indian Premier League २०२० : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.  चीननंतरइटलीमध्येकोरोनाचा कहर काढू लागला असून तिथे ४०० हून जास्त नागरिक संक्रमित झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 12:29 PM2020-03-09T12:29:07+5:302020-03-09T12:31:03+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus : BCCI Sources on if IPL 2020 will be postponed due to Corona Virus svg | Corona Virus : IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट!

Corona Virus : IPL 2020 स्पर्धा पुढे ढकलणार? BCCI कडून मिळाली मोठी अपडेट!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League २०२० : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.  चीननंतरइटलीमध्येकोरोनाचा कहर काढू लागला असून तिथे ४०० हून जास्त नागरिक संक्रमित झाले आहेत. तर उद्रेक रोखण्यासाठी अनेकांना घरातच राहण्याचे सांगण्यात आले आहे. भारतातही कोरोनाने संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली असून केरळमध्ये एका तीन वर्षांच्या बालकालाही लागण झाल्याचे समोर आले आहे. जगभरातील १०१ देशांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धांनाही फटका बसलेला जाणवत आहे. आता इंडियन प्रीमिअर लीगलाही ( आयपीएल २०२०) याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आयपीएलचा १३वा हंगाम पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) सोमवारी मोठी अपडेट दिली आहे.

कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात १७५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, त्यापैकी ८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जवळपास ८० हजार कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी ३००० जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याची माहिती आहे. जगभरात १ लाख ०७ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

आयपीएलची पुढे ढकलण्यात येईल का, यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,''आयपीएल सुरू होण्यासाठी अजून बरेच दिवस आहे. आता विचाराल, तर अजून कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेणार आहोत.''

दरम्यान, आयपीएल 2020चा पहिला सामना वानखेडेवर होणार ही घोषणा झाल्यापासून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, आयपीएल पुढे ढकलायची की नाही याबाबत महाराष्ट्र सरकार विचार करत असल्याची माहिती, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.  मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावरून आयपीएल २०२०च्या जेतेपदाच्या शर्यतीचा श्रीगणेशा करणार आहे. राजेश टोपे म्हणाले,''मोठ्या संख्येनं लोकं जिथे जमतात तेथे कोरोना व्हायरससारख्या संक्रामक रोगचा प्रसार होण्याची शक्यता वाढते. अशा स्पर्धा नंतरही आयोजित केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आयपीएल पुढे ढकलावी की नाही, यावर चर्चा सुरू आहे.''

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात दोनच भारतीय, ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व!

 ...तर स्टार्कला एका सेकंदात 'जोरू का गुलाम' ठरवलं असतं, सानिया मिर्झाचा खोचक टोमणा

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंचा 'झिंगाट' डान्स, पाहा Video

Web Title: Corona Virus : BCCI Sources on if IPL 2020 will be postponed due to Corona Virus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.