यंदाची Asia Cup टीम इंडियाशिवाय होणार?; इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर सर्व ठरणार

Asia Cup 2021 World Test Championship final भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातील कसोटी मालिका २-१ अशी यजमानांच्या पारड्यानं झुकली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 26, 2021 12:57 PM2021-02-26T12:57:11+5:302021-02-26T12:58:31+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2021 will go ahead without India participating in it because of World Test Championship final | यंदाची Asia Cup टीम इंडियाशिवाय होणार?; इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर सर्व ठरणार

यंदाची Asia Cup टीम इंडियाशिवाय होणार?; इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या निकालानंतर सर्व ठरणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडनं पहिली कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियानं दमदार कमबॅक केलं आणि पुढील दोन्ही कसोटी सामने जिंकले. या विजयानं भारताच्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC world test championship final) फायनल खेळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. न्यूझीलंडनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये आधीच प्रवेश पक्का केला आहे. त्यामुळे भारत-इंग्लंड मालिकेतील निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे. पण, टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यंदाचा Asia Cup 2021 हा टीम इंडियाशिवाय खेळवला जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघांना तीन डाव खेळायला द्या; मायकेल वॉनची खेळपट्टीवर टीका अन् युवराज सिंगचे मानले आभार

भारतानं तिसऱ्या कसोटीत अवघ्या दोन दिवसांत पाहुण्या इंग्लंडला पाणी पाजलं. इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं ४९ धावांचे माफक लक्ष्य एकही विकेट न गमावता पार केलं. या सामन्यात अक्षर पटेलनं ( Axar Patel) सामन्यात ११, तर आर अश्विननं ( R Ashwin) ७ विकेट्स घेतल्या. या पराभवानंतर इंग्लंडचा ICC World Test Championship ( जागतिक कसोटी अजिंक्यपद ) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागला. आता जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शर्यतीत आहेत. टीम इंडिया आज अदानी पोर्टवर, तर उद्या रिलायन्स रिफायनरीत; वासीम जाफरनं शेअर केला प्लान

अंतिम सामन्यासाठी असं असेल गणित
भारतानं अहमदाबाद कसोटी ( Ahmedabad Test) जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात ४९० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. भारताच्या विजयाची टक्केवारी ७१% अशी झाली आहे. इंग्लंड ६४.१ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. भारतानं जरी हा विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दिशेनं पाऊल पुढे टाकलं आहे. पण, अजूनही चौथ्या कसोटीच्या निकालावर बरंच काही अवलंबून आहे. भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील स्थान पक्कं करण्यासाठी चौथ्या कसोटीत विजय मिळवावा लागेल किंवा ती ड्रॉ करावी लागेल. पण, जर इंग्लंडनं हा सामना जिंकला, तर ऑस्ट्रेलियाचे अंतिम सामन्यातील स्थान पक्कं होईल. १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता


 

४ मार्चपासून सुरू होणार चौथी कसोटी 
भारताला ICC World Test Championship च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ३-१, २-१ असा निकाल हवा आहे, तर या मालिकेचा निकाल २-२ असा बरोबरीत लागल्यास ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये प्रवेश करेल. चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होईल. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यात ते जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचं तिकीट पक्कं करतील. लॉर्ड्स मैदानावर १८ ते २२ जून या कालावधीत न्यूझीलंडविरुद्घ हा अंतिम सामना होईल. पण, या सामन्यात खेळण्यासाठी भारताला Asia Cup 2021ला मुकावे लागेल. जून अखेरीस ते जुलै मध्यंतरापर्यंत श्रीलंकेत आशिया चषक होणार आहे.  ...अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर Virat Kohli गुजराती बोलू लागला; अक्षर पटेलचं केलं कौतुक

आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाची दुसरी फळी उतरेल
भारताचे प्रमुख खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी इंग्लंडमध्ये जाणार असल्यानं त्यांना आशिया चषक स्पर्धेत खेळता येणार नाही. अशात BCCI आशिया चषक स्पर्धेत दुसऱ्या फळीच्या खेळाडूंचा संघ पाठवू शकतो. जुलै महिन्यातच भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावर टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता अधिक आहे. तेथे भारतीय संघ तीन वन डे सामने खेळेल. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.


 

Web Title: Asia Cup 2021 will go ahead without India participating in it because of World Test Championship final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.