
...अन् नरेंद्र मोदी स्टेडियमवर Virat Kohli गुजराती बोलू लागला; अक्षर पटेलचं केलं कौतुक
ठळक मुद्देटीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी अक्षर पटेलनं ७० धावा देत ११ विकेट्स पटकावला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारअक्षरने पहिल्या दोन कसोटीत तीन वेळा डावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम
India vs England, 3rd Test : नव्या कोऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघानं दोन दिवसांत इंग्लंडला कसोटी सामन्यात ( Day Night Test) पराभवाची चव चाखवली. स्थानिक खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel) यानं हा सामना गाजवला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अवघ्या ७० धावा देत ११ विकेट्स घेणाऱ्या अक्षरला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानंही गल्ली बॉय अक्षरचं कौतुक केलं. सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या आणि अक्षर यांच्यात मुलाखत सुरू असताना विराट तेथे आला अन् गुजरातीत बोलू लागला. ( Virat Kohli's Gujarati praise ) नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियानं रचला इतिहास; नोंदवले १० मोठे विक्रम
फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारतानं वर्चस्व गाजवलं. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडिया मोठी आघाडी घेईल असेच सर्वांना वाटत होते, परंतु इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं ८ धावांत ५ विकेट्स घेत टीम इंडियाचा पहिला डाव १४५ धावांवर गुंडाळला. जॅक लिचनं ४ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही इंग्लंडला फार कमाल करता आली नाही. अक्षर पटेलनं पहिल्याच षटकात दोन धक्के दिले. त्यानं याही डावात पाच विकेट्स घेत इंग्लंडचा डाव ८१ धावांवर गुंडाळला. भारतानं ४९ धावांचे लक्ष्य सहज पार केले. या सामन्यात आर अश्विननं ७ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम
सामन्यानंतर हार्दिक पांड्या अक्षरची मुलाखत घेत होता, तितक्यात तेथे विराट आला अन् गुजरातीत म्हणाला, ए बापू थारी बॉलिंग कमाल छे.'' विराटची गुजराती पाहून हार्दिक-अक्षरही हसू लागले. ICC World Test Championship : इंग्लंडचा पत्ता कट झाला, पण टीम इंडियाचं Final चं तिकीट अजूनही पक्क नाही!
पाहा व्हिडीओ...
DO NOT MISS: @hardikpandya7 interviews man of the moment @akshar2026.👍👍 - By @RajalArora
— BCCI (@BCCI) February 26, 2021
P.S.: #TeamIndia skipper @imVkohli makes a special appearance 😎@Paytm#INDvENG#PinkBallTest
Watch the full interview 🎥 👇 https://t.co/kytMdM4JzNpic.twitter.com/QLJWMkCNM5
— King kohli⚔️ (@KingkohliEra) February 25, 2021
अक्षरने कारकिर्दीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत तीन डावांत ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला,''हा असा अनुभव यापूर्वी कधीच आला नव्हता. २ दिवसांत सामना संपला, खरंच हा विचित्र सामना ठरला. रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती, परंतु अक्षर पटेलनं त्याच्या कामगिरीनं जडेजाची उणीव जाणवू दिली नाही. गुजरातमध्ये नेमकं असं काय आहे की इथे अनेक डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत, याची मलाही कल्पना नाही.''