India vs England, 3rd Test : अक्षर पटेलची जगातल्या तगड्या गोलंदाजांना टक्कर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला विश्वविक्रम

Axar Patel World Record अक्षर पटेलनं अहमदाबाद कसोटी गाजवली. ११ विकेट्स घेत विश्वविक्रमाची नोंद केली.

कारकिर्दीतील दुसरीच कसोटी खेळणाऱ्या अक्षर पटेलनं ( Axar Patel) अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रमाला गवसणी घातली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत ( Day Night Test) ११ विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.

डे नाईट कसोटीत ११ विकेट्स घेणारा तो जगातला पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यानं पहिल्या डावात ३८ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात ३२ धावांत ५ फलंदाज माघारी पाठवले.

इंग्लंडविरुद्ध कसोटीच्या दोन्ही डावांत ५-५ विकेट्स घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी लक्ष्मण शिवारामाकृष्णन आणि आर अश्विन यांनी हा पराक्रम केला होता.

कारकिर्दीत पहिल्या दोन कसोटीत तीनवेळा पाच विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी नरेंद्र हिरवानी यांनी हा कारनामा केला.

चेन्नईतील दुसऱ्या कसोटीतून टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलनं अहमदाबाद येथेही दमदार कामगिरी करून दाखवली. चेन्नई कसोटीत त्यानं ७ विकेट्स घेतल्या होत्या.