IND vs ENG : संघांना तीन डाव खेळायला द्या; मायकेल वॉनची खेळपट्टीवर टीका अन् युवराज सिंगचे मानले आभार

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं खेळपट्टीवर टीका केली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 26, 2021 12:01 PM2021-02-26T12:01:15+5:302021-02-26T12:03:17+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG : Give the Teams 3 innings, Michael Vaughan on Ahmedabad Pitch | IND vs ENG : संघांना तीन डाव खेळायला द्या; मायकेल वॉनची खेळपट्टीवर टीका अन् युवराज सिंगचे मानले आभार

IND vs ENG : संघांना तीन डाव खेळायला द्या; मायकेल वॉनची खेळपट्टीवर टीका अन् युवराज सिंगचे मानले आभार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Day Night Test : भारत-इंग्लंड ( India vs England) तिसऱ्या कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला. इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत, तर दुसरा डाव ८१ धावांत गडगडला. इंग्लंडच्या २० पैकी १९ विकेट्स या भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. इशांत शर्माला एक विकेट मिळाली. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ( Narendra Modi Stadium) खेळपट्टीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Michael Vaughan) यानं खेळपट्टीवर टीका केली. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) यानंही खेळपट्टीवर शंका उपस्थित केली आणि वॉननं त्याचे आभार मानले. टीम इंडिया आज अदानी पोर्टवर, तर उद्या रिलायन्स रिफायनरीत; वासीम जाफरनं शेअर केला प्लान

मायकेल वॉननं दोन दिवसात सामना संपल्यानंतर ट्विट केलं की, अशी खेळपट्टी असेल, तर काय पर्याय असेल हे मी सांगू इच्छितो. दोन्ही संघांना ३-३ डाव खेळण्यास द्यावे.  १२ तासात टीम इंडियानं असा इतिहास घडविला जो १०० वर्षांत कुणाला जमला नव्हता


अहमदाबाद कसोटीत १४०.२ षटकं फेकली गेली आणि एकूण ३८७ धावा झाल्या. सामन्यात एकूण ३० विकेट्स पडल्या आणि त्यापैकी २८ विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. अक्षर पटेलनं ११, आर अश्विननं ७, वॉशिंग्टन सुंदरनं १, जॅक लिचनं ४ आणि जो रूटनं ५ विकेट्स घेतल्या. 

काय म्हणाला युवराज? 
युवराजनं ट्विट केलं की,''दोन दिवसांत निकाल लागणे, हे कसोटी क्रिकेटसाठी चांगलं आहे की नाही, याबाबत संभ्रमात आहे. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांना अशा खेळपट्टी मिळाल्या असत्या तर त्यांनी १००० व ८०० विकेट्स घेतल्या असत्या? भारतीय संघाचे अभिनंदन. अक्षर पटेलनं चांगली गोलंदाजी केली. आर अश्विन व इशांत शर्मा यांचेही अभिनंदन.''


''दोन दिवसांत कसोटी सामन्याचा निकाल. क्रिकेट चाहत्यांना हवी असलेली ही खेळपट्टी नव्हती, परंतु टीम इंडियानं या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवलं. इंग्लंडचा संघही चांगला खेळला,''असे इरफान पठाणनं ट्विट केलं.

Web Title: IND vs ENG : Give the Teams 3 innings, Michael Vaughan on Ahmedabad Pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.