राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 13:12 IST2024-10-15T13:12:00+5:302024-10-15T13:12:39+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील तब्बल ४६ इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती

Nationalist Sharad Pawar party claims three seats in Chhatrapati Sambhajinagar district | राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन जागांवर दावा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नऊपैकी तीन जागा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला हव्या आहेत. तसा दावा केल्याचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी सांगितले.

पैठण, गंगापूर- खुलताबाद व औरंगाबाद मध्य या मतदारसंघांवर आमचा दावा आहे. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीची जागा वाटपाची अंतिम चर्चा होईल. त्यात निर्णय होईल, अशी माहिती देऊन तांगडे पाटील यांनी पक्षांतर्गत कोणत्या मतदारसंघासाठी किती इच्छुकांचे अर्ज आले, त्याचीही माहिती दिली.

सिल्लोड ३, कन्नड २, फुलंब्री ५, औरंगाबाद मध्य ८, औरंगाबाद पश्चिम ६, औरंगाबाद पूर्व ८, पैठण ८, गंगापूर व खुलताबाद ५, वैजापूर १ या सर्व इच्छुकांच्या नुकत्याच पुणे येथे शरद पवार यांनी मुलाखती घेतल्या. त्यातले बोटावर मोजण्याइतके इच्छुक सोडता सर्वजण मुलाखतीस हजर होते, असे तांगडे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Nationalist Sharad Pawar party claims three seats in Chhatrapati Sambhajinagar district