ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 11:31 AM2024-04-06T11:31:14+5:302024-04-08T19:13:01+5:30

मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत.

CM said, 'Mama you fight'! Aurangabad seat belongs to Shinde shiv sena; Who will enter the field? | ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

छत्रपती संभाजीनगर : बहुचर्चित औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा महायुतीमध्ये शिंदेसेनेकडे गेली आहे. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असून उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा आज-उद्या होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या जागा वाटपात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ कोणाकडे, या विषयी प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती. मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. औरंगाबादच्या जागेसाठी भाजप आणि शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. वास्तविक, या मतदारसंघात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड गेली दोन वर्षे काम करत होते. संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता. संघटनात्मक पातळीवरदेखील भाजपने या मतदारसंघात जोरदार तयारी केली होती. अगदी बूथ प्रमुखापासून ते पोलिंग एजंटांपर्यंत सर्वांचे प्रशिक्षण पार पडले. गावनिहाय जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली होती. गेल्या वर्षभरात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले होते. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यनकीह जंगी सभा झाली होती. शाह यांनी देखील नेत्यांना ' मौलिक' सूचना करत रणनीती आखली होती. मात्र, जागा वतापाच्या गणितात शिंदेसेनेचे परेड जड ठरल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा होरमोड झाला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, 'मामा तुम्हीच लढा' !
औरंगाबादच्या जागेसाठी शिंदेसेनेकडून निवडणूक लढण्यास अनेक जन इच्छुक होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संदीपान भूमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 'वर्'षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत 'मामा तुम्हीच लढा'! अशा शब्दांत भूमरे यांना सांगितल्याचे समजते. भूमरे हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. 

पैठणकर लागले कामाला!
मंत्री भूमरे जे लोकसभेच्या मैदानात उतरणार हे निश्चित झाले आहे. मात्र त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येत असल्याने भूमरे यांचे पैठण येथील कार्यकर्ते उतर तालुक्यात मोर्चेबांधणीला लागले आहेत.

भूमरे पाच टर्म आमदार 
पैठण विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली संदीपान भुमरे पहिल्यांदा निवडून आले. २००९ चा अपवाद वगळता ते सतत निवडून येत असून आंदरकीची त्यांची ही पाचवी टर्म आहे. 

आता तिरंगी लढत होणार!
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उद्धवसेनेचे चंद्रकांत खैरे, शिंदेसेनेचे संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले विनोद पाटील, हर्षवर्धन जाधव हे काय भूमिका घेतात, यावर या लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.

Web Title: CM said, 'Mama you fight'! Aurangabad seat belongs to Shinde shiv sena; Who will enter the field?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.