वयाच्या ३० व्या वर्षी तुझा मृत्यू होईल, कुंडली पाहून निर्मात्याची भविष्यवाणी; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:41 AM2021-10-21T09:41:01+5:302021-10-21T09:45:53+5:30

माझी जन्मतारीख, वेळ आणि जन्मठिकाण याची माहिती मागितली आणि १५ दिवसांनी मला बोलावलं असं अभिनेत्रीने सांगितले.

You will die at the age of 30, the horoscope predicts the Producer; Actress Gauhar Khan revealed | वयाच्या ३० व्या वर्षी तुझा मृत्यू होईल, कुंडली पाहून निर्मात्याची भविष्यवाणी; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

वयाच्या ३० व्या वर्षी तुझा मृत्यू होईल, कुंडली पाहून निर्मात्याची भविष्यवाणी; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

Next
ठळक मुद्देतुझं काही होणार नाही. तू सिनेमा करू नको. ही स्वप्न बघणं सोडअभिनेत्री गौहर खानने फिल्मी जगतात येण्यापूर्वी अनेक वर्ष मॉडेलिंग केली आहे.निर्मात्याने त्यांच्या सिनेमात लॉन्च करण्यासाठी माझी कुंडली मागितली होती.

नवी दिल्ली – अभिनेत्री गौहर खाननं स्वत:च्या अभियनाच्या बळावर प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. सीरियल्सशिवाय वेब सीरिज आणि गाण्यांसह रिएलिटी शोजमध्येही ती दिसून येते. काही महिन्यांपूर्वी गौहर खान कृती खरबंदा आणि विक्रांत मैसीसोबत १४ फेरे यात पाहायला मिळाली. अलीकडेच तिने एका मुलाखतीत इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना घडलेला किस्सा सांगितला आहे तो ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

गौहर खान(Gauhar Khan) म्हणाली की, जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा एका निर्मात्याने माझी कुंडली मागितली होती. मी कुठल्याही सिनेमात काम करण्यापूर्वी हे घडलं होतं. ‘झलक दिखला जा’ कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी ही घटना घडली. निर्मात्याने त्यांच्या सिनेमात लॉन्च करण्यासाठी माझी कुंडली मागितली होती. हा निर्माता बॉलिवूडमधील खूप प्रसिद्ध आहे. त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. ते प्रॉडक्शन हाऊसचे प्रमुख आहेत असं ती म्हणाली.

त्यांनी माझी जन्मतारीख, वेळ आणि जन्मठिकाण माहिती मागितली. १५ दिवसांनी मला बोलावलं. मला समोर बसवून म्हणाले, तुझं काही होणार नाही. तू सिनेमा करू नको. ही स्वप्न बघणं सोड, काही उद्योग कर. वयाच्या ३०-३५ व्या वर्षी तुझा मृत्यू होईल. मला असा आजार होईल की तिशीनंतर कधीही मृत्यू होऊ शकतो. निर्मात्याच्या या गोष्टीवर मला हसायला आलं असं गौहर खान म्हणाली.

अभिनेत्री गौहर खानने फिल्मी जगतात येण्यापूर्वी अनेक वर्ष मॉडेलिंग केली आहे. गौहर खानचा पहिला सिनेमा मेन एट वर्क हा २००४ मध्ये रिलीज झाला होता. त्याशिवाय तेलुगू सिनेमातही तिने अभिनय केला आहे. २००९ मध्ये गौहर खान रिएलिटी शो झलक दिखला जा मध्ये दिसून आली होती. यावर्षी गौहर खान रणबीर कपूरसोबत फिल्म रॉकेट सिंहमध्येही दिसली होती. आजच्या घडीला गौहर खान इंडस्ट्रीमधली यशस्वी अभिनेत्री म्हणून गणली जाते. परंतु गौहर खाननं या मुलाखतीत संबंधित निर्मात्यांचे नाव जाहीर केले नाही.

Web Title: You will die at the age of 30, the horoscope predicts the Producer; Actress Gauhar Khan revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app