Salman Khan: सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा; सोमी अलीनं लग्नाबाबत केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 10:15 AM2022-01-06T10:15:43+5:302022-01-06T10:17:23+5:30

या मुलाखतीत सोमी अलीने सलमान खानला लग्नाची मागणी घातल्याचा किस्साही सांगितला

Salman Khan’s ex girlfriend Somy Ali reveals why they broke up | Salman Khan: सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा; सोमी अलीनं लग्नाबाबत केला उलगडा

Salman Khan: सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा; सोमी अलीनं लग्नाबाबत केला उलगडा

Next

नवी दिल्ली – पाकिस्तानी-अमेरिकी अभिनेत्री सोमी अली(Somy Ali) हिने बॉलिवूडमध्ये खूप कमी काळ घालवला. सोमीनं यार गद्दार, आंदोलन आणि अंतसारख्या सिनेमात काम केले. या अभिनेत्रीची पर्सनल लाइफ तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा खूप खराब राहिली. सलमान खान(Salman Khan) आणि सोमी अली यांच्या रिलेशनशिपबद्दल त्या काळात बरीच चर्चा झाली. आता सोमीनं सलमान खानसोबत लग्नाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे.

सलमानशी लग्न करण्यासाठी गाठली मुंबई

सलमान खान आणि सोमी अली ९० च्या दशकात एकमेकांसोबत दिसत होते. त्यांचे नाते कुणापासून लपून राहिले नाही. अलीकडेच द फ्रि प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सोमीनं सांगितले की, सलमान खानवर खूप क्रश होता. सलमानशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मैने प्यार किया पाहिला आणि मी सलमानवर फिदा झाले. त्यारात्री मी स्वप्न पाहिले आणि भारतात येण्याचा निर्णय घेतला. मी केवळ १६ वर्षाची होती. त्यामुळे मुंबईला जात सलमानशी लग्न करणं हा केवळ विनोद होता. मी एक सूटकेस शोधत होती आणि आईला सांगितले सलमानशी लग्न करण्यासाठी मुंबईला जातेय.

या मुलाखतीत सोमी अलीने सलमान खानला लग्नाची मागणी घातल्याचा किस्साही सांगितला. जेव्हा आम्ही दोघं नेपाळला जात होतो तेव्हा मी त्याच्या बाजूला बसले होते. मी त्याचा फोटो काढला आणि दाखवत म्हणाली मी तुझ्याशी लग्न करायला आली आहे. तेव्हा सलमान म्हणाला, माझी एक प्रेमिका आहे तेव्हा मी मला फरक पडत नाही असं सोमी म्हणाली. वयाच्या १७ व्या वर्षानंतर मी नात्यात आली. त्याने मला म्हटलं होतं मी तुझ्यावर प्रेम करतो. ही बाब विश्वासाची होती असं सोमीनं मुलाखतीत सांगितले.

सलमान खान नात्यात प्रामाणिक नव्हता

सलमान खान प्रेमाच्या नात्यात प्रामाणिक नव्हता. त्याने माझा विश्वासघात केला त्यामुळे आम्ही वेगळे झालो. मागील २० वर्ष आम्ही एकमेकांसोबत बोललो नाही. सलमानपासून दूर राहणेच माझ्यासाठी चांगले आहे. मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला तेच माझ्यासाठी योग्य होतं असंही सोमी अली म्हणाली.

अलीकडेच सलमान खानने त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या एक दिवस आधीच सलमानला बिनविषारी सापाने दंश केला. सलमानने पनवेलच्या फार्म हाऊसवर कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. सलमानच्या बर्थडेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानची भाची आयत, बहिण अर्पिता खान, आयुष शर्मा यांच्यासह केक कापताना दिसत आहे. चिमुकल्याला आयत शर्मानेही तिचा वाढदिवस सुलतानसोबत शेअर केला कारण २७ डिसेंबर २०१९ ला तिचा जन्म झाला. ज्यादिवशी सलमान खान ५४ वर्षांचा झाला होता.

Web Title: Salman Khan’s ex girlfriend Somy Ali reveals why they broke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app