Lokmat MSA 2021: कृष्णा श्रॉफ मोस्ट स्टायलिश फिटनेस आयकॉन; लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:12 PM2021-12-02T23:12:39+5:302021-12-02T23:13:32+5:30

Lokmat MSA 2021: जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ म्हणजे एक डॅशिंग पर्सनॅलिटी. फिटनेसवरचं तिचं प्रेम जगजाहीर.

Lokmat MSA 2021 krishna shroff felicitated with most stylish fitness icon award | Lokmat MSA 2021: कृष्णा श्रॉफ मोस्ट स्टायलिश फिटनेस आयकॉन; लोकमतकडून सन्मान

Lokmat MSA 2021: कृष्णा श्रॉफ मोस्ट स्टायलिश फिटनेस आयकॉन; लोकमतकडून सन्मान

Next

जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ म्हणजे एक डॅशिंग पर्सनॅलिटी. फिटनेसवरचं तिचं प्रेम जगजाहीर. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे शेकडो  वर्कआऊटचे फोटो सापडतील. हीच कृष्णा ‘लोकमत स्टायलिश अवार्ड’ सोहळ्यात मोस्ट स्टायलिश फिटनेस आयकॉन  अवार्डनं गौरविली गेली.

बॉलिवूडच्या वातावरणात वाढलेली कृष्णानं ग्लॅमर इंडस्ट्री जवळून पाहिली. पण तिला कधीच हिरोईनसारखं मिरवावं वाटलं नाही. तिने आपली वेगळी वाट निवडली. करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ इ इअर’साठी तिला ऑफर दिली. पण कृष्णानं म्हणे ती धुडकावून लावली. हिरोईन बनून पडद्यावर मिरवण्यापेक्षा रिअल लाईफमध्ये स्वत:च्या अटींवर जगणं तिनं पसंत केलं.

लाईमलाईटपासून दूर राहणाऱ्या कृष्णानं जीममध्ये पहिलं पाऊल टाकलं तेव्हा ती पर्सनल आयुष्यातील एका तुटलेल्या नात्याचं दु:ख सहन करत होती. पण तिनं ते दु:ख विसरत फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलं. फिटनेस तुम्हाला केवळ शरीरानं नाही तर मनानंही मजबूत करतो. आत्मविश्वास देतो. अगदी जग जिंकू इतका दुर्दम्य आत्मविश्वास देतो, हे कृष्णानं स्वत: अनुभवलं. फिटनेसच्या बाबतीत भाऊ टायगर हा कृष्णाची प्रेरणा आहे. 

Web Title: Lokmat MSA 2021 krishna shroff felicitated with most stylish fitness icon award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app