Aryan Khan Drug Case: आर्यननंतर अनन्या पांडेही अडकणार? चंकी पांडेच्या घरी NCBचा छापा, 'मन्नत’वरही धाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:56 PM2021-10-21T12:56:53+5:302021-10-21T13:32:03+5:30

Aryan Khan Drug Case , NCB :आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे.

Aryan Khan Drug Case Bollywood Drugs Case: NCB Raids Ananya Panday Home | Aryan Khan Drug Case: आर्यननंतर अनन्या पांडेही अडकणार? चंकी पांडेच्या घरी NCBचा छापा, 'मन्नत’वरही धाड

Aryan Khan Drug Case: आर्यननंतर अनन्या पांडेही अडकणार? चंकी पांडेच्या घरी NCBचा छापा, 'मन्नत’वरही धाड

googlenewsNext
ठळक मुद्देरिपोर्टनुसार, ज्या दिवशी आर्यनला क्रूजवरून एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडे ही सुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती.

शाहरूख खानचा लेक आर्यन खान  (Aryan Khan) क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी (Aryan Khan Drug Case) तुरुंगात आहेत. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या रडारवर आली आहे.
गुरूवारी एनसीबी अधिकारी अनन्याच्या घरी धडकले. पाठोपाठ शाहरूख खानच्या मन्नत या बंगल्यावरही एनसीबी अधिका-यांनी छापेमारी केली.  ही बातमी समोर येताच, सर्वांनाच धक्का बसला.
रिपोर्टनुसार, आर्यनचे काही व्हॉट्सअ‍ॅप चट्स एनसीबीच्या हाती लागले आहेत. क्रूझ ड्रग्स पार्टी केसमध्ये आर्यन खानसोबत बॉलिवूडमधील एका उगवत्या अभिनेत्रीचे चॅट एनसीबीच्या हाती लागल्याची माहिती आहे. या चॅटमध्ये नशेबाबत बोलणं  झालं होतं. ही अभिनेत्री म्हणजे, अनन्या पांडे असल्याचं समजतंय. अर्थात या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर आज एनसीबी अधिका-यांनी अनन्याच्या घरी धाड टाकली.
अनन्याच्या घरी छापामारी केल्यानंतर एनसीबीने दुपारी 2 वाजता अभिनेत्रीला चौकशीसाठी बोलविल्याचं कळतंय.

त्या दिवशी क्रूझवरील होती...?
रिपोर्टनुसार, ज्या दिवशी आर्यनला क्रूजवरून एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडे ही सुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती. मात्र कथितरित्या एनसीबीने तिला जाऊ दिले होते. पण आर्यनच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव आल्यानं एनसीबी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. 
अनन्या ही आर्यनची चांगली मैत्रिण आहे. आर्यनची बहीण सुहाना खान ही सुद्धा अनन्याची बेस्ट फ्रेंड आहे.
 

Read in English

Web Title: Aryan Khan Drug Case Bollywood Drugs Case: NCB Raids Ananya Panday Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.