स्वरा भास्कर लवकरच होणार आई; म्हणाली, आता आणखी वाट पाहवत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 03:12 PM2021-11-25T15:12:16+5:302021-11-25T15:13:02+5:30

अभिनेत्री स्वरा भास्करनं दिली गोड बातमी; प्रक्रियेला सुरुवात

actress swara bhasker to be mother soon planning to adopt a child | स्वरा भास्कर लवकरच होणार आई; म्हणाली, आता आणखी वाट पाहवत नाही!

स्वरा भास्कर लवकरच होणार आई; म्हणाली, आता आणखी वाट पाहवत नाही!

Next

मुंबई: चित्रपटातील अभियनानं चाहत्यांची मनं जिंकणारी स्वरा भास्कर तिच्या खऱ्या आयुष्यात स्पष्ट आणि सडेतोड विधानांमुळे चर्चेत असते. सध्या सिंगल असलेली स्वरानं आई होण्याचा निर्णय घेतला आहे. स्वरा लवकरच एक मूल दत्तक घेणार आहे. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती स्वरानं दिली आहे.

एका मुलाखतीत स्वरानं कुटुंब आणि मुलाबद्दलची इच्छा बोलून दाखवली. देशात अनेक मुलांना आई वडील नाहीत. ती मुलं अनाथालयात राहतात, असं स्वरानं सांगितलं. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून मूल दत्तक घेतलेल्या जोडप्यांशी बोलत असल्याचंही तिनं सांगितलं. ती मिड डे वर्तमानपत्राशी बोलत होती.

'कुटुंब असावं, मूल असावं अशी माझी आधीपासूनची इच्छा आहे. मूल दत्तक घेतल्यानं माझं स्वप्न पूर्ण होईल असं मला वाटतं. सुदैवानं आपल्या देशात सिंगल महिलांना मूल दत्तक घेण्याची परवानगी आहे. मूल दत्तक घेतलेल्या अनेक जोडप्यांशी मी सध्या संवाद साधतेय. यातील अनेक मुलं आता सज्ञान झाली आहेत. मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया, त्याबद्दलचा अनुभव याबद्दल अधिक माहिती घेण्याचा माझा प्रयत्न आहे,' असं स्वरा म्हणाली.

अनेकांशी बोलल्यानंतर आणि बरीच माहिती गोळा केल्यानंतर स्वरानं पालकांना मूल दत्तक घेण्याबद्दल पालकांना सांगितलं. स्वराच्या या निर्णयात संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत आहे. स्वरानं CARAच्या माध्यमातून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. हा कालावधी मोठा आहे. पण आता मला आणखी वाट पाहवत नाही, असं स्वरानं म्हटलं.

Web Title: actress swara bhasker to be mother soon planning to adopt a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app