Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स ३९४, तर निफ्टी १६१ अंकांनी कोसळले, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स ३९४, तर निफ्टी १६१ अंकांनी कोसळले, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

सेन्सेक्सचे २९ आणि निफ्टीचे ४९ शेअर्स 'लाल निशाणावर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 10:06 IST2026-05-20T10:05:36+5:302026-05-20T10:06:25+5:30

सेन्सेक्सचे २९ आणि निफ्टीचे ४९ शेअर्स 'लाल निशाणावर'

Share Market Updates: Big fall in the stock market! Sensex falls by 394 points, Nifty by 161 points, investors lose crores | शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स ३९४, तर निफ्टी १६१ अंकांनी कोसळले, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स ३९४, तर निफ्टी १६१ अंकांनी कोसळले, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

Stock Market Today 20 May, 2026: भारतीय शेअर बाजार आज (दि.२०) पुन्हा एकदा मोठ्या घसरणीसह उघडला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव याचा थेट फटका देशांतर्गत शेअर बाजाराला बसत आहे.

आज बाजार उघडताच मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक 'बीएसई सेन्सेक्स' ३९४.३६ अंकांनी (०.५२ टक्के) घसरून ७४,८०६.४९ अंकांवर उघडला झाला. तर दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजारचा निर्देशांक 'एनएसई निफ्टी ५०' १६०.७५ अंकांनी (०.६८ टक्के) कोसळून २३,४५७.२५ अंकांवर उघडला. विशेष म्हणजे, मंगळवारी बाजाराची सुरुवात वाढीसह झाली होती, पण बाजार बंद होताना तो घसरणीसह बंद झाला होता. आज सलग दुसऱ्या दिवशी ही घसरण कायम राहिली.

सेन्सेक्सचे २९ आणि निफ्टीचे ४९ शेअर्स 'लाल निशाणावर'

सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणावर उघडले, तर केवळ १ कंपनीचा शेअर हिरव्या निशाणावर (वाढीसह) उघडला. निफ्टी ५० ची स्थितीही अशीच होती. निफ्टीमधील ५० पैकी ४९ कंपन्यांचे शेअर्स घसरले आणि केवळ एका शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीसीचा शेअर आज ०.१४ टक्क्यांच्या वाढीसह हिरव्या निशाणावर उघडला. तर दुसरीकडे, बीईएलचा शेअर आज सर्वाधिक २.०४ टक्क्यांच्या घसरणीसह उघडला.

कोणत्या शेअरमध्ये किती घसरण? पाहा...

कंपनीचे नावघसरण (टक्केवारी)
टाटा स्टील  १.९४%
एटरनल १.७८%
मारुति सुझुकी १.५५%
महिंद्रा अँड महिंद्रा १.४९%
बजाज फायनान्स  १.३४%
एसबीआय  १.२१%
आयसीआयसीआय बँक  १.१८%
टेक महिंद्रा १.०८%

इतर घसरलेले मुख्य शेअर्स:
बजाज फिनसर्व्ह (१.०४%), एनटीपीसी (१.०३%), हिंदुस्थान युनिलिव्हर (०.९८%), पॉवर ग्रिड (०.९७%), अल्ट्राटेक सिमेंट (०.९६%), ट्रेंट (०.९४%), कोटक महिंद्रा बँक (०.९३%), एशियन पेंट्स (०.९०%), एचसीएल टेक (०.८९%), इंडिगो (०.८code६%), आयटीसी (०.८१%), टायटन (०.७८%), अ‍ॅक्सिस बँक (०.७७%), एलअँडटी (०.७१%), अदानी पोर्ट्स (०.५७%), एचडीएफसी बँक (०.base५५%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.५०%), इन्फोसिस (०.४६%), सन फार्मा (०.१३%) आणि भारती एअरटेलचा शेअर ०.०८ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होता.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title : शेयर बाजार में भारी गिरावट: सेंसेक्स, निफ्टी में गिरावट; निवेशकों को करोड़ों का नुकसान

Web Summary : कच्चे तेल की बढ़ती कीमतों और भू-राजनीतिक तनाव के बीच भारतीय शेयर बाजार भारी गिरावट के साथ खुला। सेंसेक्स 394 अंक गिरा, निफ्टी 161. अधिकांश शेयरों में गिरावट, टाटा स्टील में सबसे अधिक गिरावट आई। निवेशकों को भारी नुकसान।

Web Title : Stock Market Plunges: Sensex, Nifty Crash; Investors Lose Crores

Web Summary : Indian stock markets opened sharply lower amid rising crude oil prices and geopolitical tensions. Sensex fell 394 points, Nifty 161. Most stocks traded in red, with Tata Steel leading the decline. Investors face significant losses.