Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Silver Price Today: चांदीचा धडाका! २० दिवसांत ८५ हजारांची वाढ; किमतींनी ओलांडला ३ लाखांचा टप्पा, आता गुंतवणूकदारांनी काय करावं?

Silver Price Today: चांदीचा धडाका! २० दिवसांत ८५ हजारांची वाढ; किमतींनी ओलांडला ३ लाखांचा टप्पा, आता गुंतवणूकदारांनी काय करावं?

Silver Price Hike: २०२६ या वर्षाची सुरुवात चांदीसाठी जबरदस्त ठरली आहे. अवघ्या काही आठवड्यांत चांदी ३५ टक्क्यांहून अधिक वधारली आहे, म्हणजेच प्रति किलो सुमारे ८५ हजार रुपयांची तेजी नोंदवण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:27 IST2026-01-20T15:25:14+5:302026-01-20T15:27:15+5:30

Silver Price Hike: २०२६ या वर्षाची सुरुवात चांदीसाठी जबरदस्त ठरली आहे. अवघ्या काही आठवड्यांत चांदी ३५ टक्क्यांहून अधिक वधारली आहे, म्हणजेच प्रति किलो सुमारे ८५ हजार रुपयांची तेजी नोंदवण्यात आली आहे.

Silver price boom Increase of 85 thousand in 20 days Prices crossed the 3 lakh mark what should investors do now | Silver Price Today: चांदीचा धडाका! २० दिवसांत ८५ हजारांची वाढ; किमतींनी ओलांडला ३ लाखांचा टप्पा, आता गुंतवणूकदारांनी काय करावं?

Silver Price Today: चांदीचा धडाका! २० दिवसांत ८५ हजारांची वाढ; किमतींनी ओलांडला ३ लाखांचा टप्पा, आता गुंतवणूकदारांनी काय करावं?

Silver Price Hike: २०२६ या वर्षाची सुरुवात चांदीसाठी जबरदस्त ठरली आहे. अवघ्या काही आठवड्यांत चांदी ३५ टक्क्यांहून अधिक वधारली आहे, म्हणजेच प्रति किलो सुमारे ८५ हजार रुपयांची तेजी नोंदवण्यात आली आहे. पुरवठ्याची कमतरता आणि अमेरिका, इराण व ग्रीनलँडशी संबंधित वाढत्या भू-राजकीय तणावामुळे चांदीची मागणी अधिक मजबूत झाली आहे. याच कारणामुळे गुंतवणूकदार आता या पातळीवर खरेदी करावी, नफा वसूल करावा की गुंतवणूक टिकवून ठेवावी या विचारात पडले आहेत.

चांदीच्या तेजीचा नवा विक्रम

या आठवड्यात चांदीच्या तेजीनं तेव्हा नवा विक्रम प्रस्थापित केला, जेव्हा MCX वर 'सिल्व्हर फ्युचर्स'नं ३ लाख रुपये प्रति किलोची महत्त्वाची पातळी ओलांडली. आजच्या व्यवहारात चांदीचे दर २.५ टक्क्यांहून अधिक वधारले आणि सुमारे ८ हजार रुपयांच्या वाढीसह ३,१९,९४९ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील नवीन तणावाच्या बातम्या समोर आल्यानंतर बाजारातील ही उसळी अधिक वेगवान झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत दिलेलं विधान आणि युरोपवर कडक टॅरिफ लावण्याची धमकी यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

सलग दहाव्या दिवशी आपटला Ola Electric चा शेअर; सीएफओंच्या राजीनाम्यानंतर आणखी वाईट स्थिती, पाहा डिटेल्स

काय म्हणतात तज्ज्ञ?

कमोडिटी तज्ज्ञ आमिर मकडा यांच्या मते, चांदीमधील ही तेजी 'परफेक्ट स्टॉर्म'चा परिणाम आहे, ज्यामध्ये औद्योगिक कमतरता आणि जागतिक राजकारण या दोन्हीची मोठी भूमिका आहे. मात्र, त्यांनी असा इशाराही दिला आहे की, तांत्रिक चार्ट्समध्ये RSI वर 'बेअरीश डायव्हर्जन्स' दिसत आहे, जो एक 'रेड फ्लॅग' मानला जातो. याचा अर्थ असा की, किमती जरी वर जात असल्या तरी अंतर्गत मजबुती कमी होत आहे. 'ओपन इंटरेस्ट'मधील घट देखील 'लॉन्ग अनवाइंडिंग'कडे निर्देश करत आहे, अशा परिस्थितीत सध्याच्या गुंतवणूकदारांनी नफावसुलीवर लक्ष दिलं पाहिजे.

पुढेही तेजी राहणार का?

रिलायन्स सिक्युरिटीजचे जिगर त्रिवेदी यांच्या मते, नजीकच्या भविष्यात चांदीमध्ये काही काळ 'कन्सोलिडेशन' पाहायला मिळू शकते. परंतु, आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशीच राहिली तर भाव १०० डॉलर प्रति औंसपर्यंतही जाऊ शकतात. रुपयाच्या हिशोबात ३,३०,००० रुपये प्रति किलो हा पुढील मोठा 'रेझिस्टन्स' आहे. शॉर्ट टर्म ट्रेडर्सनी सावध राहावं, तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांदी अजूनही महागाई आणि बाजारातील अनिश्चिततेपासून संरक्षणाचा एक मजबूत पर्याय आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : चांदी में उछाल! कीमतें ₹3 लाख के पार, निवेशकों को क्या करना चाहिए?

Web Summary : चांदी की कीमतों में 20 दिनों में ₹3 लाख/किलो से अधिक की उछाल! विशेषज्ञों ने अल्पकालिक व्यापारियों को सावधानी बरतने की सलाह दी है, दीर्घकालिक निवेशक बाजार अनिश्चितताओं के कारण होल्डिंग पर विचार कर सकते हैं।

Web Title : Silver surge! Prices hit ₹3 lakh, what should investors do?

Web Summary : Silver prices surge past ₹3 lakh/kg in 20 days! Experts advise caution for short-term traders, long-term investors can consider holding due to market uncertainties.