Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > चांदी दीड हजाराने घसरली, सोन्यात मात्र तेजी; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर...

चांदी दीड हजाराने घसरली, सोन्यात मात्र तेजी; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर...

Gold-Silver Rate: सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतारांची मालिका सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:02 IST2026-05-19T12:01:41+5:302026-05-19T12:02:35+5:30

Gold-Silver Rate: सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतारांची मालिका सुरूच आहे.

Gold-Silver Rate: Silver fell by 1500, but gold rose; Know the new rate before buying | चांदी दीड हजाराने घसरली, सोन्यात मात्र तेजी; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर...

चांदी दीड हजाराने घसरली, सोन्यात मात्र तेजी; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवे दर...

Gold-Silver Rate: बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतारांची मालिका सुरूच आहे. आज, मंगळवारी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून, चांदी तब्बल दीड हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

चांदीत घसरण, सोन्यात किरकोळ वाढ

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळी ९:५१ वाजताच्या सुमारास, ५ जूनच्या डिलिव्हरीचे सोने ९३ रुपयांच्या (०.०६%) किरकोळ वाढीसह १,५८,९९६ रुपये प्रति १० ग्रॅम वर व्यवहार करत आहे. तर, ३ जुलैच्या डिलिव्हरीची चांदी ०.५४% (१४८५ रुपये) घसरून २,७५,१६६ रुपये प्रति किलो ग्रॅम वर व्यवहार करत आहे.

सराफा बाजारातील स्थिती

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या अहवालानुसार, सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळाले. सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदी १,००० रुपयांच्या तेजीसह २,७६,००० रुपये प्रति किलो वर बंद झाली होती. तर, ९९.९% शुद्धतेच्या सोन्याच्या दरात सोमवारी कोणताही बदल झाला नाही. सोने आपल्या जुन्याच दरावर, म्हणजेच १,६२,८०० रुपये प्रति १० ग्रॅम वर स्थिर राहिले.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title : चाँदी में भारी गिरावट, सोना मामूली बढ़ा; जानें नये रेट।

Web Summary : सोने की कीमतों में मामूली वृद्धि हुई, जबकि चांदी ₹1,500 गिरी। एमसीएक्स पर सोना मामूली बढ़ा, चांदी में भारी गिरावट आई। दिल्ली के सराफा बाजार में चांदी बढ़ी, लेकिन सोना स्थिर रहा। निवेश से पहले विशेषज्ञों से सलाह लें।

Web Title : Silver plunges, gold rises slightly; know the latest rates.

Web Summary : Gold prices saw a minor increase, while silver plummeted by ₹1,500. MCX gold futures rose slightly, while silver futures fell significantly. Delhi's bullion market saw silver rise, but gold remained steady. Consult experts before investing.