Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम

मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम

PPF Account On Childs Name: सध्याच्या महागाईच्या काळात मुलांचं उच्च शिक्षण आणि लग्न यांसाठी मोठा निधी जमा करणं पालकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. अशा परिस्थितीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पालकांसाठी एक अत्यंत विश्वासू आणि सुरक्षित माध्यम ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:01 IST2026-05-15T13:56:40+5:302026-05-15T14:01:35+5:30

PPF Account On Childs Name: सध्याच्या महागाईच्या काळात मुलांचं उच्च शिक्षण आणि लग्न यांसाठी मोठा निधी जमा करणं पालकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. अशा परिस्थितीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पालकांसाठी एक अत्यंत विश्वासू आणि सुरक्षित माध्यम ठरू शकते.

Worries about childrens future is over You can raise a fund worth lakhs for education and marriage through PPF Know the rules | मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम

मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम

PPF Account On Childs Name: सध्याच्या महागाईच्या काळात मुलांचं उच्च शिक्षण आणि लग्न यांसाठी मोठा निधी जमा करणं पालकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. अशा परिस्थितीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पालकांसाठी एक अत्यंत विश्वासू आणि सुरक्षित माध्यम ठरू शकते. पीपीएफ केवळ करात बचत करत नाही, तर सरकारी सुरक्षेसह दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. आजच जर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावानं गुंतवणूक सुरू केली, तर मूल १८ वर्षांचे होईपर्यंत त्याच्या गरजांसाठी एक मोठी रक्कम तयार होईल.

गुंतवणुकीची मर्यादा काय आहे?

नियमांनुसार, कोणत्याही अल्पवयीन मुलाच्या नावे केवळ एकच पीपीएफ खातं उघडता येऊ शकतं. मूल जोपर्यंत सज्ञान होत नाही, तोपर्यंत पालकांद्वारे हे खातं चालवलं जातं. या खात्यात वर्षाला किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येते. पालक आपल्या स्वतःच्या आणि मुलाच्या अशा दोन्ही खात्यांमध्ये मिळून एका वर्षात एकूण फक्त १.५ लाख रुपयांपर्यंतच रक्कम जमा करू शकतात, ज्यावर नियमानुसार टॅक्स सूट मिळते.

पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."

खातं उघडण्यासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

पीपीएफ खातं कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सहज उघडता येतं. यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

  • मुलाचा जन्म दाखला हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
  • पालकांचं पॅन कार्ड.
  • पालकांचा पत्त्याचा पुरावा.
  • पासपोर्ट साईझ फोटो.


आता अनेक बँका नेट बँकिंगच्या माध्यमातून ऑनलाइन खातं उघडण्याची सुविधाही देत आहेत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक सुरू करू शकता.

लॉक-इन पीरियड आणि इतर फायदे

पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असतो, ज्यामुळे हा मुलांसाठी एक आदर्श दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय ठरतो. १५ वर्षांनंतर हे खातं ५-५ वर्षांच्या ब्लॉक पद्धतीमध्ये पुढे वाढवता येऊ शकतं. जर उच्च शिक्षण किंवा गंभीर आजाराचा उपचार यांसारखी विशेष परिस्थिती निर्माण झाली, तर नियमांनुसार या खात्यातून अंशतः पैसे काढण्याची परवानगी देखील मिळते. सुरक्षित आणि हमखास परतावा शोधणाऱ्या पालकांसाठी ही योजना एक सर्वोत्तम आणि जोखीममुक्त पर्याय आहे.

Web Title : बच्चों के भविष्य की चिंता खत्म! PPF से शिक्षा, विवाह के लिए बनाएं फंड

Web Summary : पीपीएफ बच्चों की शिक्षा और विवाह के लिए एक महत्वपूर्ण कोष बनाने का एक सुरक्षित तरीका है। माता-पिता बच्चे के पीपीएफ खाते में सालाना ₹1.5 लाख तक निवेश कर सकते हैं, सरकारी समर्थन के साथ कर लाभ और दीर्घकालिक विकास का आनंद ले सकते हैं। खाते की परिपक्वता 15 वर्ष है, जिसे 5-वर्षीय ब्लॉकों में बढ़ाया जा सकता है।

Web Title : Secure your child's future: Invest in PPF for education, marriage!

Web Summary : PPF offers a secure way to build a substantial fund for children's education and marriage. Parents can invest up to ₹1.5 lakh annually in a child's PPF account, enjoying tax benefits and long-term growth with government backing. Account maturity is 15 years, extendable in 5-year blocks.