Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी ₹7.8 लाख कोटींची तरतूद; सैन्य आधुनिकीकरणाला मिळणार चालना

संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी ₹7.8 लाख कोटींची तरतूद; सैन्य आधुनिकीकरणाला मिळणार चालना

Union Budget 2026 : विविध आधुनिक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने वेगाने तयार केली जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 14:28 IST2026-02-01T14:27:05+5:302026-02-01T14:28:45+5:30

Union Budget 2026 : विविध आधुनिक क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमाने वेगाने तयार केली जाणार!

Union Budget 2026: Record allocation of ₹7.8 lakh crore for defense sector; Army modernization will get a boost | संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी ₹7.8 लाख कोटींची तरतूद; सैन्य आधुनिकीकरणाला मिळणार चालना

संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी ₹7.8 लाख कोटींची तरतूद; सैन्य आधुनिकीकरणाला मिळणार चालना

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज(1 फेब्रुवारी 2026) रोजी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी विक्रमी ₹7.8 लाख कोटींची तरतूद जाहीर केली आहे. ही तरतूद मागील आर्थिक वर्षातील ₹6.81 लाख कोटींच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते. या अर्थसंकल्पातून सरकारचा स्पष्ट संदेश आहे की, देशाची सुरक्षा, सैन्याची ताकद आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला सर्वोच्च प्राधान्य असेल.

संरक्षण बजेटचे प्रमुख आकडे

एकूण संरक्षण बजेट: ₹7.8 लाख कोटी (मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 14-15% वाढ)

कॅपिटल बजेट (आधुनिकीकरणासाठी): ₹1.80 लाख कोटींवरून वाढवून ₹2.19 लाख कोटी

फोकस:

सैन्याचे आधुनिकीकरण

स्वदेशी शस्त्रनिर्मिती (आत्मनिर्भर भारत)

संरक्षण निर्यात वाढवणे

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर बजेट महत्त्वाचे

रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील अस्थिरता, भारत-चीन सीमावाद आणि भारत-पाकिस्तान सीमेवरील आव्हाने पाहता भारताला आपली संरक्षण क्षमता मजबूत करण्याची गरज होती. ड्रोन युद्ध, सायबर हल्ले आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे महत्त्व वाढले असून, हा अर्थसंकल्प त्या दिशेने मोठे पाऊल मानला जात आहे.

महत्त्वाचे संरक्षण प्रकल्प 

राफेल फायटर जेट

नौसेनेसाठी 26 किंवा अधिक Rafale-M विमानांची खरेदी प्रस्तावित

भारतीय वायुसेनेत आधीच 36 राफेल कार्यरत

स्टेल्थ सबमरीन – प्रोजेक्ट 75

6 नवीन स्टेल्थ सबमरीन

अत्याधुनिक AIP (Air Independent Propulsion) तंत्रज्ञान

ड्रोन आणि UAV

MQ-9B सारखे हाय-एल्टिट्यूड ड्रोन

स्वदेशी ड्रोन व काउंटर-ड्रोन सिस्टिम

आधुनिक युद्धात ड्रोनचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन मोठी गुंतवणूक

इतर प्रकल्प

LCA तेजस Mk1A / Mk2

LCH ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर

ब्रह्मोस क्षेपणास्त्र

S-400 एअर डिफेन्स सिस्टीम

नवीन मिसाइल आणि रडार प्रणाली

स्वदेशी संरक्षण उद्योगाला मोठा दिलासा

एअरक्राफ्ट पार्ट्ससाठी लागणाऱ्या रॉ मटेरियलवर बेसिक कस्टम ड्युटी माफ

मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल (MRO) सुविधा वाढणार

संरक्षण उत्पादनाचा खर्च कमी होऊन देशांतर्गत उत्पादनाला चालना

सिव्हिल, ट्रेनिंग आणि इतर विमानांच्या पार्ट्सनाही ड्युटी सवलत

एविएशन फ्युएल (ATF) आणि संरक्षण सज्जता

Web Title : रक्षा क्षेत्र के लिए रिकॉर्ड ₹7.8 लाख करोड़ का बजट; सैन्य आधुनिकीकरण को बढ़ावा

Web Summary : भारत का रक्षा बजट ₹7.8 लाख करोड़ तक पहुंचा, जो 14-15% की वृद्धि है, सैन्य आधुनिकीकरण और स्वदेशी उत्पादन को प्राथमिकता। राफेल जेट, स्टेल्थ पनडुब्बियां और ड्रोन पर ध्यान केंद्रित, वैश्विक तनावों को संबोधित करते हुए आत्मनिर्भरता को बढ़ावा। शुल्क छूट का उद्देश्य घरेलू रक्षा उद्योग को बढ़ावा देना है।

Web Title : Record ₹7.8 Lakh Crore Defence Budget Boosts Military Modernization

Web Summary : India's defense budget hits ₹7.8 lakh crore, a 14-15% jump, prioritizing military modernization and indigenous production. Focus areas include Rafale jets, stealth submarines, and drones, addressing global tensions and bolstering self-reliance. Duty exemptions aim to boost domestic defense industry.