Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले!

ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले!

सेन्सेक्स १०६६ अंकांनी कोसळला; परकीय गुंतवणूकदारांचा पैसे काढून घेण्याचा ओघ सुरूच; रुपया घसरून ९०.९७ च्या नीचांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 08:11 IST2026-01-21T08:08:15+5:302026-01-21T08:11:36+5:30

सेन्सेक्स १०६६ अंकांनी कोसळला; परकीय गुंतवणूकदारांचा पैसे काढून घेण्याचा ओघ सुरूच; रुपया घसरून ९०.९७ च्या नीचांकी पातळीवर

Trump's tariff threat causes chaos in the market; Indian investors lose Rs 10 lakh crore! | ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले!

ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:  जागतिक राजकारणातील वाढता तणाव आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेल्या ‘टॅरिफ वॉर’मुळे भारतीय शेअर बाजाराला मंगळवारी मोठा धक्का बसला. बाजार घसरल्यामुळे एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल ९.८६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०६६ अंकांनी कोसळून ८२,१८० वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’देखील ३५३ अंकांनी घसरून २५,२३२.५० वर आला आहे. केवळ एका महिन्यात सेन्सेक्स तब्बल ३ हजार अंकांनी घसरून खाली आला आहे.

सोने दीड लाखांपुढे तर चांदी गेली थेट ३.२३ लाखांवर

जागतिक बाजारातील घडामोडी आणि देशांतर्गत मागणीच्या जोरावर दिल्लीत सोन्याने पहिल्यांदाच १.५० लाख प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. सोन्यासोबत चांदीनेही विक्रमी उसळी घेतली असून, ती एका दिवसात २०,४०० रुपयांनी वाढली. ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात एका दिवसात ५,१०० रुपयांची वाढ झाली. यामुळे सोमवारी १ लाख ४८ हजार १०० रुपयांवर असलेले सोने मंगळवारी थेट १,५३,२०० रुपयांवर (करांसह) पोहोचले आहे. तर चांदी  ३.२३ लाख रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.

रुपया गेला आणखी तळात

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७ पैशांनी घसरून ९०.९७ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर बंद झाला. सध्या अनेक कारणांमुळे रुपयावर दबाव आहे.

Web Title : ट्रंप की टैरिफ धमकी से बाजार में हाहाकार; भारतीय निवेशकों को भारी नुकसान

Web Summary : ट्रंप की टैरिफ धमकियों से बाजार में भारी गिरावट आई, जिससे भारतीय निवेशकों को ₹9.86 लाख करोड़ का नुकसान हुआ। सेंसेक्स 1066 अंक गिरा। सोना ₹1.5 लाख के पार, चांदी ₹3.23 लाख तक पहुंची। डॉलर के मुकाबले रुपया 90.97 के रिकॉर्ड निचले स्तर पर।

Web Title : Trump's Tariff Threat Triggers Market Turmoil; Indian Investors Lose Billions

Web Summary : Trump's tariff threats sparked market chaos, wiping out ₹9.86 lakh crore in Indian investments. Sensex plunged 1066 points. Gold soared past ₹1.5 lakh, silver hit ₹3.23 lakh. Rupee fell to a record low of 90.97 against the dollar.