Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला

Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीसह कामकाजाची सुरुवात झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स २१२.५८ अंकांच्या (०.२७ टक्के) घसरणीसह ७७,६३१.९४ अंकांवर उघडला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 10:05 IST2026-05-08T10:05:29+5:302026-05-08T10:05:29+5:30

Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीसह कामकाजाची सुरुवात झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स २१२.५८ अंकांच्या (०.२७ टक्के) घसरणीसह ७७,६३१.९४ अंकांवर उघडला.

Stock Market Today Stock market starts with a decline Sensex opens with a decline of 213 and Nifty 93 points | Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला

Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीसह कामकाजाची सुरुवात झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स २१२.५८ अंकांच्या (०.२७ टक्के) घसरणीसह ७७,६३१.९४ अंकांवर उघडला. तर, एनएसईच्या निफ्टी ५० इंडेक्सने देखील आज ९३.०० अंकांच्या (०.३८ टक्के) नुकसानीसह २४,२३३.६५ अंकांवर व्यवहार सुरू केला. शुक्रवारी दोन्ही प्रमुख इंडेक्सचे अर्ध्याहून अधिक शेअर रेड झोनमध्ये उघडले. गुरुवारी देखील बाजार घसरणीसह रेड झोनमध्ये बंद झाला होता. मात्र, बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराने बंपर वाढीसह व्यवहार बंद केला होता.

फक्त ७ शेअर्स ग्रीन झोनमध्ये

बुधवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त ७ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या निशाणीत उघडले आणि बाकीच्या सर्व २३ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणीत उघडले. त्याचप्रमाणे, निफ्टी ५० च्या ५० पैकी फक्त १४ कंपन्यांचे शेअर्स तेजीसह उघडले आणि बाकीच्या सर्व ३६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. सेन्सेक्सच्या कंपन्यांमध्ये समाविष्ट एशियन पेंट्सचे शेअर्स आज सर्वाधिक ०.८८ टक्के वाढ होऊन आणि ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स आज सर्वाधिक १.२८ टक्के घसरणीसह उघडले.

ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?

कोणत्या शेअर्समध्ये तेजी / घसरण?

आज सेन्सेक्सच्या इतर स्टॉक्समध्ये बीईएलचे शेअर्स ०.५७ टक्के, टेक महिंद्रा ०.४४ टक्के, अदानी पोर्ट्स ०.१८ टक्के, इन्फोसिस ०.०४ टक्के आणि टायटनचे शेअर्स ०.०२ टक्क्यांच्या वाढीसह उघडले.

तर दुसरीकडे, शुक्रवारी ॲक्सिस बँकचे शेअर्स १.१८ टक्के, एचडीएफसी बँक १.०७ टक्के, एटरनल ०.९१ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.८३ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.७८ टक्के, मारुती सुझुकी ०.६० टक्के, एल अँड टी ०.५३ टक्के, बजाज फायनान्स ०.५१ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.४८ टक्के, टाटा स्टील ०.४४ टक्के, एनटीपीसी ०.४२ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.४० टक्के, सन फार्मा ०.३८ टक्के, टीसीएस ०.३१ टक्के, इंडिगो ०.२८ टक्के, एसबीआय ०.२२ टक्के, ट्रेंट ०.१७ टक्के, पॉवर ग्रिड ०.१४ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.०९ टक्के, भारती एअरटेल ०.०८ टक्के, एचसीएल टेक ०.०२ टक्के आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स ०.०१ टक्के घसरणीसह उघडले.

Web Title : शेयर बाजार गिरावट के साथ खुला; सेंसेक्स, निफ्टी में गिरावट

Web Summary : भारतीय शेयर बाजार शुक्रवार को गिरावट के साथ खुला। सेंसेक्स 213 अंक और निफ्टी 93 अंक गिरा। गुरुवार को गिरावट के बाद ज्यादातर शेयर लाल क्षेत्र में कारोबार कर रहे थे, जबकि बुधवार को तेजी आई थी।

Web Title : Stock market opens lower; Sensex, Nifty decline in early trade.

Web Summary : Indian stock market started on a negative note Friday. Sensex fell by 213 points, and Nifty by 93. Most shares traded in the red zone after a fall on Thursday, contrasting with Wednesday's gains.