Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारातील 'मंदी'तही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरनं घेतलाय रॉकेटस्पीड; सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट!

बाजारातील 'मंदी'तही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरनं घेतलाय रॉकेटस्पीड; सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट!

अनुभवी गुंतवणूकदार विजय केडिया यांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:46 IST2026-01-20T17:45:06+5:302026-01-20T17:46:56+5:30

अनुभवी गुंतवणूकदार विजय केडिया यांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती.

Stock market Mangalam Drugs and Organics share hits upper circuit for 16th day rallied over 125 percent | बाजारातील 'मंदी'तही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरनं घेतलाय रॉकेटस्पीड; सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट!

बाजारातील 'मंदी'तही गुंतवणूकदारांची चांदी! 'या' शेअरनं घेतलाय रॉकेटस्पीड; सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट!

गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. या घसरणीतही, मंगलम ड्रग्ज अँड ऑरगॅनिक्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आहे. मंगळवारी बीएसईवर मंगलम ड्रग्ज अँड ऑरगॅनिक्सचा शेअर ५% वधारून ₹५१.९२ वर बंद झाला. २९ डिसेंबर २०२५ पासून या शेअरला सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. १६ दिवसांत मंगलम ड्रग्ज अँड ऑरगॅनिक्सचा शेअर १२५% पेक्षाही अदिक वधारला आहे. अनुभवी गुंतवणूकदार विजय केडिया यांनीही या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती.

१६ दिवसांत दिला १२५% पेक्षाही अधिकचा परतवा -
मंगलम ड्रग्ज अँड ऑरगॅनिक्सचा शेअर १६ दिवसांत १२५% हूनही अधिक वधारला आहे. २९ डिसेंबर २०२५ रोजी फार्मा कंपनीचा शेअर २२.७० वर होते. तो २० जानेवारी २०२६ रोजी बीएसईवर ५१.९२ वर बंद झाला. या वर्षी आतापर्यंत मंगलम ड्रग्जचा शेअर ७९% पेक्षा जास्त वधारला आहे. १ जानेवारी २०२६ रोजी कंपनीचा शेअर ₹२८.९६ वर होते आणि आता ते ₹५२ च्या जवळ पोहोचला आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये २१% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹१२३ आहे.

विजय केडिया यांचीही होती गुंतवणूक - 
प्रसिद्ध गुंतवणूकदार विजय केडिया यांनी त्यांच्या गुंतवणूक फर्म केडिया सिक्युरिटीजच्या माध्यमातून मंगलम ड्रग्ज अँड ऑरगॅनिक्सचे प्रति शेअर ₹२४.१५ या किमतीने तब्बल १३७,७९४ शेअर्स  खरेदी केले होते. तथापि, विजय केडिया यांनी अलीकडेच मंगलम ड्रग्जचे अंदाजे १.३८ लाख शेअर्स विकले. केडिया यांनी हे शेअर्स एकूण ₹४८.३५ लाख किमतीला विकले. महत्वाचे म्हणजे, चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत मंगलम ड्रग्ज अँड ऑरगॅनिक्सला ₹९.८४ कोटींचा तोटा झाला आहे. 
 

Web Title : बाजार में गिरावट के बावजूद, मंगलम ड्रग्स के निवेशकों की चांदी!

Web Summary : बाजार में गिरावट के बावजूद मंगलम ड्रग्स एंड ऑर्गेनिक्स के शेयरों में तेजी आई, 16 दिनों से अपर सर्किट लग रहा है। शेयरों में 16 दिनों में 125% की वृद्धि हुई, जिससे विजय केडिया जैसे निवेशक आकर्षित हुए। हाल के नुकसान के बावजूद, स्टॉक ऊपर की ओर बढ़ रहा है।

Web Title : Despite Market Slump, Investors Shine with Mangalam Drugs' Rocket Speed!

Web Summary : Mangalam Drugs & Organics shares surge despite market downturn, hitting upper circuit for 16 days. Shares rose 125% in 16 days, attracting investors like Vijay Kedia. Despite a recent loss, the stock continues its upward trajectory.