Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची 'ऐंशी' पार भरारी! ८४,००० च्या ऐतिहासिक टप्प्यावर बाजार; एसबीआयचे शेअर्स सुसाट

सेन्सेक्सची 'ऐंशी' पार भरारी! ८४,००० च्या ऐतिहासिक टप्प्यावर बाजार; एसबीआयचे शेअर्स सुसाट

Stock Market : सोमवारी, सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त २१ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित सर्व ९ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:38 IST2026-02-09T16:38:40+5:302026-02-09T16:38:40+5:30

Stock Market : सोमवारी, सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त २१ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित सर्व ९ कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात बंद झाले.

Stock Market Closing Feb 9 Sensex Rises 463 Points, SBI Gains 7% on India-US Trade Pact | सेन्सेक्सची 'ऐंशी' पार भरारी! ८४,००० च्या ऐतिहासिक टप्प्यावर बाजार; एसबीआयचे शेअर्स सुसाट

सेन्सेक्सची 'ऐंशी' पार भरारी! ८४,००० च्या ऐतिहासिक टप्प्यावर बाजार; एसबीआयचे शेअर्स सुसाट

Stock Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळाली. भारत आणि अमेरिका यांच्यात शनिवारी झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचे सकारात्मक पडसाद आज दलाल स्ट्रीटवर उमटले. बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील समभागांनी आज बाजाराला चांगली साथ दिली. व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजारचानिर्देशांक सेन्सेक्स ४६३.१५ अंकांनी वधारून ८४,०४३.५५ वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी १७३.६० अंकांनी वधारून २५,८६७.३० वर बंद झाला.

'एसबीआय'ची तुफानी फटकेबाजी
आजच्या तेजीचे खरे सारथ्य भारतीय स्टेट बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने केले. एसबीआयच्या शेअरमध्ये आज ७.४६ टक्क्यांची मोठी वाढ पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये मोठी खरेदी केल्याने सेन्सेक्समधील ही सर्वात मोठी वाढ ठरली. त्याखालोखाल टायटन (२.७८%) आणि टाटा स्टील (२.५६%) या कंपन्यांनीही चांगली कमाई केली.

बाजारातील आजचे 'विजेते' आणि 'पराजित'
तेजीतील प्रमुख शेअर्स : स्टेट बँक ७.४६, टायटन २.७८, टाटा स्टील २.५६, अल्ट्राटेक सिमेंट २.५२, कोटक महिंद्रा बँक १.५२
घसरणीतील प्रमुख शेअर्स : पॉवरग्रिड - १.११, आयटीसी - १.०७, एनटीपीसी - ०.८९, आयसीआयसीआय बँक - ०.६८, इन्फोसिस - ०.६५

वाचा - कंपन्यांनी ७.५ लाखांपर्यंत पीएफ भरला तर 'नो टॅक्स'! केंद्र सरकारचा पीएफ धारकांसाठी मोठा निर्णय

बाजार हिरव्या निशाणात का?

  • भारत-अमेरिका व्यापार करार : दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुलभ करण्याच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. 
  • बँकिंग क्षेत्रातील खरेदी: एसबीआय आणि कोटक बँक यांसारख्या मोठ्या बँकांच्या शेअर्समध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रस दाखवला. 
  • सकारात्मक सुरुवात: बाजाराने आज व्यवहाराची सुरुवातच वाढीसह केल्याने शेवटपर्यंत तो कल कायम राहिला. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ कंपन्यांचे शेअर्स आज नफ्यात बंद झाले.

Web Title : सेंसेक्स 80,000 के पार! बाजार ने रचा इतिहास; एसबीआई के शेयर में उछाल

Web Summary : अमेरिकी व्यापार समझौते और बैंकिंग क्षेत्र के लाभ से भारतीय शेयर बाजार में तेजी आई। सेंसेक्स 84,043.55 के रिकॉर्ड उच्च स्तर पर बंद हुआ, एसबीआई के शेयर 7.46% की वृद्धि के साथ सबसे आगे रहे।

Web Title : Sensex Soars Past 80,000! Market Hits Record; SBI Shares Surge

Web Summary : Indian stock market surged, fueled by a US trade deal and banking sector gains. Sensex closed at a record high of 84,043.55, with SBI shares leading the rally with a 7.46% jump.