lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स

Reliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स

Reliance Jio : अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह पाहा कोणत्या मिळतायत अन्य सुविधा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 03:31 PM2021-05-16T15:31:29+5:302021-05-16T15:35:35+5:30

Reliance Jio : अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह पाहा कोणत्या मिळतायत अन्य सुविधा.

reliance jio introduced new jiophone plans of rs 39 and rs 69 airtel vodafone idea | Reliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स

Reliance Jio नं आणले सर्वात स्वस्त प्लॅन; किंमत ३९ आणि ६९ रूपये, पाहा कोणते मिळतायत बेनिफिट्स

Highlightsअनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह पाहा कोणत्या मिळतायत अन्य सुविधा.यापूर्वी कंपनीनं एकावर एक मोफत रिचार्जचीही केली होती घोषणा

दूरसंचार क्षेत्रातील कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या कंपन्या सध्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक निरनिराळे प्लॅन्स आणत आहे. सध्या रिलायन्स जिओनं दोन स्वस्त प्लॅन्स लाँच केले आहेत. ३९ आणि ६९ रूपये अशी या प्लॅन्सची किंमत आहे. या दोन्ही प्लॅन्समध्ये कंपनी ग्राहकांना १४ दिवसांची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देत आहे. परंतु या प्लॅन्सचा वापर केवळ जिओ फोन युझर्सनाच करता येणार आहे. नुकतीच कंपनीनं जिओ फोनसाठी फ्री कॉलिंग मिनिट्स आणि एका रिचार्जवर एक रिचार्ज मोफत अशा सुविधाही आणल्या होत्या.

३९ रूपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यापूर्वी कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत ७५ रूपये होती. ३९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १४ दिवसांची वैधता आणि रोज १०० एसएमएस देण्यात येतात. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एमबी डेटाही देण्यात येतो. याशिवाय ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळतं. 

हेही वाचा - ५० रूपयांनी स्वस्त, दररोज १ जीबी डेटा आणि अन्य बेनिफिट्स; पाहा कोणता आहे Reliance Jio चा प्लॅन

६९ रूपयांचा प्लॅन

६९ रूपयांचा प्लॅन हा ३९ रूपयांच्या प्लॅनप्रमाणाचे आहे. यामध्ये केवळ डेटाचा फरक आहे. यामध्ये ग्राहकांना १४ दिवसांची वैधता मिळते. तसंच दररोज ५०० एमबी डेटा देण्यात येतो. याशिवाय ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 

हेही वाचा - १.६४ रूपयांत मिळेल ५०० एमबी डेटा, वर्षभर रिचार्जमधून सुट्टी; पाहा Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन

एकावर एक रिचार्ज मोफत

यापूर्वी कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी आणखी सुविधा दिल्या होता. कोरोनाच्या महासाथीदरम्यान ग्राहकांना दर महिन्याला ३०० मिनिट्स मोफत दिले जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलं. दररोज १० मिनिटांच्या हिशोबानं ग्राहकांना ३०० मिनिट्स दिले जातील. याशिवाय जिओ फोन रिचार्ज केल्यानंतर त्याच किंमतीचा एक प्लॅनही मोफत देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं. 

Web Title: reliance jio introduced new jiophone plans of rs 39 and rs 69 airtel vodafone idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.