lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बारावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती़

बारावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती़

Oil India Recruitment 2020, Sarkari Naukri, Govt Job: ऑईल इंडिया लिमिटेडने ऑपरेटरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 09:20 PM2020-08-22T21:20:13+5:302020-08-22T21:42:20+5:30

Oil India Recruitment 2020, Sarkari Naukri, Govt Job: ऑईल इंडिया लिमिटेडने ऑपरेटरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Oil India Recruitment 2020, Sarkari Naukri, Govt Job: 12th pass youth get government job opportunity, recruitment in Oil India Limited | बारावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती़

बारावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी, ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये निघाली भरती़

Highlightsऑईल इंडिया लिमिटेडने ऑपरेटरच्या पदांसाठी जाहीर केली भरती वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतातइच्छुक उमेदवार www.oil-india.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील

नवी दिल्ली - १२ वी पास तरुणांना नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडने ऑपरेटरच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार www.oil-india.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी १८ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग टेस्टच्या माध्यमातून होईल.

पद ऑपरेटर-I (एचएमव्ही), ग्रेड VII
पदांची संख्या - ३६
वेतन - १६ ते ३४ हजार रुपये

पात्रता - इच्छुक उमेदवाराना मान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापीठातून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इच्छुक उमेदवाराकडे चार वर्षे जुने ड्रायव्हिंग लासन आणि तीन वर्षे अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा - इच्छुक उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या वयोमर्यादेची गणना १८ सप्टेंबर २०२० पासून केली जाईल.

नोंदणी शुक्ल - या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सामान्य आणि ओबीसींसाठी २०० रुपये नोंदणी शुल्क आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यएस आणि माजी सैनिक यांना कुठलेली शुल्क जमा करावे लागणार नाही.

या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात २१ ऑगस्ट २०२० पासून झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तिथी ही १८ सप्टेंबर आहे.

या पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑईल इंडिया लिमिटेडच्या www.oil-india.com या संकेतस्थळावर जाऊन दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज भरल्यानंतर त्याची एक छापील प्रत आपल्याकडे ठेवा. उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि ड्रायव्हिंग टेस्टच्या माध्यमातून होईल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: Oil India Recruitment 2020, Sarkari Naukri, Govt Job: 12th pass youth get government job opportunity, recruitment in Oil India Limited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.