Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > NHAI चा झटका, प्रवास महागणार, १ एप्रिलपासून वार्षिक टोल पास ₹३,००० नाही, तर इतक्या रुपयांना मिळणार

NHAI चा झटका, प्रवास महागणार, १ एप्रिलपासून वार्षिक टोल पास ₹३,००० नाही, तर इतक्या रुपयांना मिळणार

FASTag Annual Pass: जर तुम्ही तुमच्या कारनं वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि वार्षिक टोल पास वापरत असाल, तर आता तुमच्या खिशावरचा भार वाढणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 08:31 IST2026-03-14T08:31:09+5:302026-03-14T08:31:09+5:30

FASTag Annual Pass: जर तुम्ही तुमच्या कारनं वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि वार्षिक टोल पास वापरत असाल, तर आता तुमच्या खिशावरचा भार वाढणार आहे.

NHAI s shock travel will become more expensive from April 1st annual toll pass will be available for Rs 3075 instead of Rs 3000 | NHAI चा झटका, प्रवास महागणार, १ एप्रिलपासून वार्षिक टोल पास ₹३,००० नाही, तर इतक्या रुपयांना मिळणार

NHAI चा झटका, प्रवास महागणार, १ एप्रिलपासून वार्षिक टोल पास ₹३,००० नाही, तर इतक्या रुपयांना मिळणार

FASTag Annual Pass: जर तुम्ही तुमच्या कारनं वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि वार्षिक टोल पास वापरत असाल, तर आता तुमच्या खिशावरचा भार वाढणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून राष्ट्रीय महामार्गावर मिळणारा वार्षिक टोल पास महाग होणार आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ केली आहे. आता १ एप्रिल २०२६ पासून वाहनधारकांना या पाससाठी ३,००० रुपयांऐवजी ३,०७५ रुपये मोजावे लागणार आहेत.

वार्षिक टोल पासचे हे नवीन दर आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी लागू होतील. हा पास केवळ खाजगी वाहनांसाठीच उपलब्ध असतो आणि यासाठी वाहनामध्ये 'ॲक्टिव्ह FASTag' असणं अनिवार्य आहे.

आजही खुला राहणार शेअर बाजार, 'या' खास कारणामुळे होणार BSE आणि NSE वर आज ट्रेडिंग

२०० वेळा टोल ओलांडण्याची मर्यादा

वार्षिक टोल पास हा एक वर्षासाठी किंवा २०० वेळा टोल ओलांडण्यासाठी वैध असतो. याचा अर्थ असा की, जर एखाद्या वाहनाने २०० वेळा टोल प्लाझा ओलांडला, तर एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्या पासची वैधता संपेल.

टोल दरांमध्ये किरकोळ वाढ

नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना १ एप्रिल २०२६ पासून नवीन दर लागू करण्याचे आणि याची माहिती प्रवासी व इतर भागधारकांना देण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, टोल दरांचा दरवर्षी आढावा घेऊन त्यात सुधारणा केली जाते. याच प्रक्रियेअंतर्गत यंदा वार्षिक पासच्या किमतीत किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी सोयीचा पर्याय

ज्या लोकांचे राष्ट्रीय महामार्गावरून रोजचं किंवा वारंवार येणं-जाणं असतं, त्यांच्यासाठी हा वार्षिक टोल पास अजूनही एक सोयीस्कर पर्याय मानला जातो. यामुळे वारंवार टोल भरण्याची समस्या कमी होते.

वार्षिक टोल पास कसा मिळवाल?

राष्ट्रीय महामार्गावर वारंवार प्रवास करणारे वाहनधारक सहजपणे वार्षिक टोल पास बनवू शकतात. ही सुविधा NHAI तर्फे दिली जाते. यासाठी वाहन मालक NHAI च्या पोर्टलवर किंवा त्यांच्या FASTag जारी करणाऱ्या बँक/ॲपवर लॉग-इन करून अर्ज करू शकतात. वार्षिक पाससाठी निर्धारित शुल्क ऑनलाईन भरावं लागेल. पेमेंट केल्यानंतर, हा वार्षिक पास तुमच्या FASTag शी लिंक केला जातो, त्यानंतर तुम्ही टोल प्लाझावर अतिरिक्त पैसे न भरता प्रवास करू शकता.

Web Title : NHAI ने बढ़ाया वार्षिक टोल पास: अप्रैल 2026 से महंगा होगा सफर

Web Summary : राष्ट्रीय राजमार्गों पर यात्रा करना महंगा होगा। NHAI ने 1 अप्रैल, 2026 से वार्षिक FASTag पास की कीमतें बढ़ाकर ₹3,075 कर दी हैं। यह सक्रिय FASTag वाले निजी वाहनों पर लागू होता है। पास एक वर्ष या 200 क्रॉसिंग के लिए वैध है। नियमित यात्री NHAI पोर्टल या FASTag प्रदाताओं के माध्यम से आवेदन कर सकते हैं।

Web Title : NHAI Hikes Annual Toll Pass: Cost Increases from April 2026

Web Summary : Traveling on national highways will be costlier. NHAI increased annual FASTag pass prices to ₹3,075 from April 1, 2026. This applies to private vehicles with active FASTags. The pass is valid for one year or 200 crossings. Frequent travelers can apply via NHAI portal or FASTag providers.