Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बाजारात पडझड, पण 'पारस पेट्रोफिल्स'च्या स्टॉकनं उडवला धुरळा; एका महिन्यात दिला बंपर परतावा!

बाजारात पडझड, पण 'पारस पेट्रोफिल्स'च्या स्टॉकनं उडवला धुरळा; एका महिन्यात दिला बंपर परतावा!

...मात्र, या पडझडीतही 'पारस पेट्रोफिल्स लिमिटेड' (Paras Petrofils Ltd) चा शेअरने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:01 IST2026-01-30T15:59:04+5:302026-01-30T16:01:19+5:30

...मात्र, या पडझडीतही 'पारस पेट्रोफिल्स लिमिटेड' (Paras Petrofils Ltd) चा शेअरने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडत आहे.

Markets crash, but Paras Petrofils stock blew up delivered bumper returns in a month | बाजारात पडझड, पण 'पारस पेट्रोफिल्स'च्या स्टॉकनं उडवला धुरळा; एका महिन्यात दिला बंपर परतावा!

बाजारात पडझड, पण 'पारस पेट्रोफिल्स'च्या स्टॉकनं उडवला धुरळा; एका महिन्यात दिला बंपर परतावा!

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारीही मोठी घसरण दिसून आली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्येही मोठी घसरण दिसू आली. सुरुवातीच्या केवळ १५ मिनिटांतच गुंतवणूकदारांचे सुमारे ४ लाख कोटी रुपये बुडाले. मात्र, या पडझडीतही 'पारस पेट्रोफिल्स लिमिटेड' (Paras Petrofils Ltd) चा शेअरने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडत आहे.

५ व्यापारी सत्रांत तब्बल ६३ टक्क्यांनी वधारला शेअर -
खरे तर, बाजारात सर्वत्र लाल निशाण दिसत असतानाच, पारस पेट्रोफिल्सचा शेअर २०% च्या अप्पर सर्किटसह २.७० रुपयांवर पोहोचला. ३ रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या शेअरने गेल्या महिनाभरात आपल्या गुंतवणूकदारांना ५०.८४% एवढा परतावा दिला आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी या शेअरची किंमत १.७९ रुपये एवढी होती. जो गेल्या ५ व्यापारी सत्रांत तब्बल ६३ टक्क्यांनी वधारला.

५ वर्षांत ७९% परतावा -
लॉन्ग टर्मचा विचार करता, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना निराशाच केले. गेल्या एका वर्षात हा शेअर ५.६३% घसरला. तसेच ५ वर्षांचा विचार करता, या शेअरने ७९% एवढाच परतावा दिला. जून २०२४ मध्ये हा शेअर ४.४९ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, नतंर त्यात घसरण सुरू झाली.

काय करते कंपनी? -
ही कंपनी पूर्वी नायलॉन, पॉलिस्टर यार्न आणि टेक्सटाइल क्षेत्रात कार्यरत होती. मात्र, बाजारातील खराब परिस्थितीमुळे कंपनीने सध्या आपले कामकाज बंद केले आहे. आता कंपनी आपले कारखाने विकून 'बांधकाम' (Construction) क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. बीएसईच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, कंपनीचे मार्केट कॅप. ९०.२४ कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

Web Title : बाजार में गिरावट, पर 'पारस पेट्रोफिल्स' के शेयर में उछाल, शानदार रिटर्न!

Web Summary : बाजार में गिरावट के बीच, पारस पेट्रोफिल्स के शेयर ने रुझान को नकारा, पांच सत्रों में 63% की वृद्धि हुई। लंबी अवधि का रिटर्न मिश्रित है, लेकिन हालिया प्रदर्शन शानदार रहा है। कंपनी निर्माण में परिवर्तन कर रही है, जिसका बाजार पूंजीकरण ₹90.24 करोड़ है।

Web Title : Market crashes, but Paras Petrofils stock soars, delivers bumper returns!

Web Summary : Amidst market downturn, Paras Petrofils' stock defied trends, surging 63% in five sessions. While long-term returns are mixed, recent performance has been stellar. The company, transitioning to construction, boasts a market cap of ₹90.24 crore.