Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयफोन, वाईन आणि बदाम आता खिशाला परवडणार! अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफमध्ये मोठी कपात

आयफोन, वाईन आणि बदाम आता खिशाला परवडणार! अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफमध्ये मोठी कपात

India-US Trade Deal: अमेरिका आणि भारत यांच्यातील अंतरिम व्यापार कराराची चौकट गेल्या शनिवारी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील समान व्यापार आणि परस्पर फायद्यांचा उल्लेख आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 10:27 IST2026-02-08T10:02:41+5:302026-02-08T10:27:23+5:30

India-US Trade Deal: अमेरिका आणि भारत यांच्यातील अंतरिम व्यापार कराराची चौकट गेल्या शनिवारी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील समान व्यापार आणि परस्पर फायद्यांचा उल्लेख आहे.

India-US Interim Trade Agreement 2026 Laptops and iPhones to Get Cheaper for Indian Consumers | आयफोन, वाईन आणि बदाम आता खिशाला परवडणार! अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफमध्ये मोठी कपात

आयफोन, वाईन आणि बदाम आता खिशाला परवडणार! अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफमध्ये मोठी कपात

India-US Trade Deal : भारत आणि अमेरिका या जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांनी शनिवारी एका 'अंतरिम व्यापार करारावर' शिक्कामोर्तब केले आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार तणाव कमी होणार असून, भारतीय ग्राहकांसाठी अमेरिकन वस्तू आणि भारतीय निर्यातदारांसाठी अमेरिकन बाजारपेठ स्वस्त व सुलभ होणार आहे. जॉइंट स्टेटमेंटनुसार, भारत अमेरिकेतून येणाऱ्या कृषी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील आयात शुल्क एकतर पूर्णपणे रद्द करेल किंवा लक्षणीयरीत्या कमी करेल.

भारतीय ग्राहकांसाठी काय स्वस्त होणार?
अमेरिकेतून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवरील टॅरिफ कमी केल्यामुळे खालील वस्तूंच्या किमतीत घट होणार आहे. यामध्ये बदाम, अक्रोड, ताजी आणि प्रक्रिया केलेली फळे, कडधान्ये. इलेक्ट्रॉनिक्समध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स व घरगुती उपकरणे. तसेच सोयाबीन तेल, पॅकेज्ड फूड, वाईन आणि स्पिरिट, तसेच पशूखाद्यासाठी लागणारे लाल ज्वार आणि डीडीजी अशा वस्तू स्वस्त होतील.

भारतीय निर्यातदारांना 'जॅकपॉट'; ५०% टॅरिफ आता थेट १८ टक्क्यांवर!
हा करार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरणार आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर दंडात्मक शुल्कासह एकूण ५०% टॅरिफ लावला होता. आता तो थेट १८ टक्क्यांवर आणला आहे. यामुळे भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होतील.

या क्षेत्रांना होणार मोठा फायदा

  • कापड उद्योग : रेडीमेड कपडे आणि टेक्सटाईल.
  • औषध उद्योग : जेनेरिक औषधे आणि सेंद्रिय रसायने.
  • दागिने : हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढणार.
  • हस्तकला : होम डेकोर, हस्तकलेच्या वस्तू आणि चर्मोद्योग.

वाचा - सॅलरी लिमिट, पेन्शन... नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी भेट देण्याच्या तयारीत सरकार, जाणून घ्या

परस्पर लाभाचा नवा अध्याय
"आम्ही समान आणि परस्पर फायद्याच्या व्यापारासाठी एक फ्रेमवर्क तयार केले आहे," असे दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या बाजारपेठा एकमेकांसाठी खुल्या झाल्या असून, यामुळे जागतिक व्यापारात भारताचे स्थान अधिक बळकट होणार आहे.

Web Title : भारत-अमेरिका व्यापार समझौता: आईफोन, वाइन, बादाम होंगे सस्ते!

Web Summary : भारत और अमेरिका के बीच व्यापार समझौता हुआ है, जिससे अमेरिकी वस्तुओं पर शुल्क कम होगा। बादाम, इलेक्ट्रॉनिक्स, वाइन सस्ते होंगे। भारतीय निर्यात को बढ़ावा मिलेगा, कपड़ा, दवा, आभूषण, हस्तशिल्प क्षेत्रों को लाभ होगा। दोनों अर्थव्यवस्थाओं के लिए फायदेमंद।

Web Title : US-India Trade Deal: Cheaper iPhones, Wine, and Almonds Coming!

Web Summary : India and US finalize trade deal, slashing tariffs on American goods. Expect cheaper almonds, electronics, wine. Indian exports get a boost with reduced tariffs, benefiting textiles, pharmaceuticals, jewelry, and handicrafts sectors. A win-win for both economies.