Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताला कोणत्याही देशाकडून कच्चं तेल घेण्याचं स्वातंत्र्य; व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीबाबत रशियाचं मोठं विधान

भारताला कोणत्याही देशाकडून कच्चं तेल घेण्याचं स्वातंत्र्य; व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीबाबत रशियाचं मोठं विधान

Russia On Crude Oil Supply: भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या चर्चांदरम्यान रशियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाहा काय म्हटलंय रशियानं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:37 IST2026-02-05T12:25:42+5:302026-02-05T12:37:12+5:30

Russia On Crude Oil Supply: भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या चर्चांदरम्यान रशियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाहा काय म्हटलंय रशियानं?

India has the freedom to buy crude oil from any country Russia s big statement on donald trump buying Venezuelan oil | भारताला कोणत्याही देशाकडून कच्चं तेल घेण्याचं स्वातंत्र्य; व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीबाबत रशियाचं मोठं विधान

भारताला कोणत्याही देशाकडून कच्चं तेल घेण्याचं स्वातंत्र्य; व्हेनेझुएलाच्या तेल खरेदीबाबत रशियाचं मोठं विधान

Russia On Crude Oil Supply: भारतानंरशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्या चर्चांदरम्यान रशियाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियाने म्हटलंय की, भारताला कोणत्याही देशाकडून कच्चं तेल खरेदी करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठादारांमध्ये विविधता आणण्याचा नवी दिल्लीचा प्रयत्न नवीन नाही आणि तो मॉस्कोच्या विरोधातही नाही.

रशिया भारताचा एकमेव भागीदार नाही

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, रशिया कधीही भारताचा एकमेव ऊर्जा भागीदार नव्हता. त्यामुळे तेल खरेदीच्या स्रोतांमध्ये बदल होणे ही गोष्ट असामान्य मानणं चुकीचं ठरेल. इतर आंतरराष्ट्रीय ऊर्जा तज्ंज्ञांप्रमाणेच आम्हालाही माहित आहे की भारत नेहमीच इतर देशांकडून तेल उत्पादनं खरेदी करत आला आहे, त्यामुळे यात काहीही नवीन नाही.

कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून लंडनमध्ये पाणीपुरी विकतंय हे IITian कपल; एका प्लेटची किंमत आहे ५००० रुपये

अमेरिकेचा दावा आणि रशियाचं उत्तर

पेस्कोव यांचं हे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर आलं आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, भारत-अमेरिका व्यापार करारांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास आणि त्याऐवजी अमेरिका व व्हेनेझुएला कडून कच्चे तेल खरेदी करण्यास सहमत झाले आहेत. मात्र, रशियन प्रवक्त्यानं स्पष्ट केलं की, रशियन तेल खरेदी बंद करण्याबाबत भारताकडून त्यांना कोणतीही अधिकृत माहिती किंवा तसे संकेत मिळालेले नाहीत.

ऊर्जा सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचं

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनीदेखील दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्याचं समर्थन केलंय. त्यांच्या मते, हायड्रोकार्बनचा व्यापार भारत आणि रशिया या दोघांसाठीही फायदेशीर आहे. झाखारोवा म्हणाल्या की, भारताकडून होणारी रशियन तेलाची खरेदी जागतिक ऊर्जा बाजारात स्थिरता राखण्यास मदत करते. आम्ही आमच्या भारतीय भागीदारांसोबत अधिक सहकार्य सुरू ठेवण्यास तयार आहोत.

Web Title : भारत किसी भी देश से तेल खरीद सकता है: रूस का स्पष्टीकरण

Web Summary : रूस ने कहा कि भारत किसी भी देश से तेल खरीदने के लिए स्वतंत्र है, आपूर्तिकर्ताओं में विविधता लाने की चिंताओं को खारिज किया। मॉस्को का कहना है कि वह कभी भी भारत का एकमात्र ऊर्जा भागीदार नहीं था और पारस्परिक लाभ के लिए निरंतर ऊर्जा सहयोग का स्वागत करता है, भले ही अमेरिका का दावा कुछ और हो।

Web Title : India free to buy oil from any country: Russia clarifies.

Web Summary : Russia states India is free to buy oil from any country, dismissing concerns over diversifying suppliers. Moscow asserts it was never India's sole energy partner and welcomes continued energy cooperation for mutual benefit, despite US claims.