Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?

Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?

Canara Bank FD Schemes : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कॅनरा बँकेनं यावर्षी जानेवारीत आपल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरांमध्ये सुधारणा केली होती. तेव्हापासून बँकेचे व्याजदर स्थिर असून, ग्राहकांना आजही आकर्षक परतावा मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:51 IST2026-05-11T10:48:34+5:302026-05-11T10:51:12+5:30

Canara Bank FD Schemes : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कॅनरा बँकेनं यावर्षी जानेवारीत आपल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरांमध्ये सुधारणा केली होती. तेव्हापासून बँकेचे व्याजदर स्थिर असून, ग्राहकांना आजही आकर्षक परतावा मिळत आहे.

How much interest will you get if you deposit Rs 2 lakh in a 444 day FD in Canara Bank what will be the total amount in the account | Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?

Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?

Canara Bank FD Schemes : सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य कॅनरा बँकेनं यावर्षी जानेवारीत आपल्या फिक्स्ड डिपॉझिटच्या दरांमध्ये सुधारणा केली होती. तेव्हापासून बँकेचे व्याजदर स्थिर असून, ग्राहकांना आजही आकर्षक परतावा मिळत आहे. या बँकेत मुदत ठेवींवर किमान ३.०० टक्क्यांपासून ते कमाल ७.१० टक्क्यांपर्यंत व्याज ऑफर केलं जात आहे. विशेषतः बँकेच्या 'स्पेशल एफडी' योजना सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.

४४४ आणि ५५५ दिवसांच्या खास योजना

कॅनरा बँकेत तुम्ही किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी करू शकता. मात्र, सर्वाधिक परतावा हवा असल्यास बँकेच्या ४४४ दिवस आणि ५५५ दिवसांच्या विशेष योजना फायदेशीर ठरतात.

४४४ दिवसांची योजना : यावर ६.४५% ते ७.०५% दरम्यान व्याज मिळतं.
५५५ दिवसांची योजना : यावर ६.५०% ते ७.१०% पर्यंत बंपर व्याज दिलं जात आहे.

२ लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळेल?

जर तुम्ही ४४४ दिवसांच्या विशेष योजनेत २ लाख रुपये गुंतवले, तर वयोगटानुसार मिळणारा परतावा खालीलप्रमाणे असेल:

सामान्य नागरिक : २ लाख रुपयांवर १६,१८९ रुपये व्याज मिळून मुदतीनंतर एकूण २,१६,१८९ रुपये मिळतील.
ज्येष्ठ नागरिक : यांना १७,४८६ रुपये व्याज मिळून एकूण २,१७,४८६ रुपये मिळतील.
अति ज्येष्ठ नागरिक : यांना १७,७४६ रुपये व्याज मिळून मुदतीनंतर एकूण २,१७,७४६ रुपये मिळतील.

महत्त्वाची वैशिष्ट्ये

कॅनरा बँकेच्या या विशेष योजना कमी कालावधीत जास्त परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय आहेत. जानेवारीनंतर दरांमध्ये बदल झाला नसल्यानं, सध्याचे दर स्थिर आणि फायदेशीर आहेत. विशेषतः ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा अधिक व्याज मिळत असल्यानं त्यांच्यासाठी ही सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे. 

Web Title : केनरा बैंक एफडी: ₹2 लाख निवेश, ब्याज दरें, और लाभ

Web Summary : केनरा बैंक की 444-दिन की एफडी आकर्षक लाभ प्रदान करती है। ₹2 लाख का निवेश सामान्य नागरिकों के लिए ₹16,189, वरिष्ठ नागरिकों के लिए ₹17,486 और अति वरिष्ठ नागरिकों के लिए ₹17,746 ब्याज देता है। जनवरी से दरें स्थिर हैं, जिससे यह एक अच्छा अल्पकालिक निवेश है।

Web Title : Canara Bank FD: ₹2 Lakh Investment, Interest Rates, and Returns

Web Summary : Canara Bank's 444-day FD offers attractive returns. Investing ₹2 lakh yields ₹16,189 interest for general citizens, ₹17,486 for seniors, and ₹17,746 for super seniors. Rates are stable since January, making it a good short-term investment.