Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Rate 29 April: लग्नसराईच्या हंगामाच्या धामधुमीत सराफा बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २९ एप्रिल रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:14 IST2026-04-29T14:06:37+5:302026-04-29T14:14:03+5:30

Gold Silver Rate 29 April: लग्नसराईच्या हंगामाच्या धामधुमीत सराफा बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २९ एप्रिल रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली.

Gold Silver Rate 29 April Change in gold and silver rates ibja Check the new rates of 14 to 24 carat gold before buying | Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Silver Rate 29 April: लग्नसराईच्या हंगामाच्या धामधुमीत सराफा बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २९ एप्रिल रोजी सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली असून, यामुळे खरेदीदारांच्या पदरी थोडी निराशा आली आहे. २४ कॅरेट सोनं आज ₹३९ नं महाग होऊन ₹१,४८,८२१ प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं. दुसरीकडे, चांदीच्या भावात ₹२,३७० ची मोठी उसळी नोंदवण्यात आली असून, ती ₹२,३८,९११ प्रति किलोच्या पातळीवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे विशेषतः लग्नाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे नवीन दर

आयबीजेएच्या ताज्या आकडेवारीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹३६ नं वधारून ₹१,३६,३२० प्रति १० ग्रॅम झाला आहे. यामध्ये जीएसटी समाविष्ट नाही; जर ३% जीएसटी जोडला तर ही किंमत सुमारे ₹१,४०,४०९ पर्यंत पोहोचते. तसंच १८ कॅरेट सोनं देखील ₹२९ ने महाग होऊन ₹१,११,६१६ वर पोहोचलं असून, करासह याची किंमत सुमारे ₹१,१४,९६४ इतकी होते.

टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?

२३ आणि १४ कॅरेट सोन्यातही तेजी

सोन्याच्या इतर कॅरेटमध्येही दरवाढीचा कल कायम आहे. २३ कॅरेट सोनं ₹३९ नं वधारून ₹१,४८,२२५ प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. तसंच १४ कॅरेट सोने ₹२२ नं महाग होऊन ₹८७,०६० प्रति १० ग्रॅम झालं आहे. 

'ऑल टाइम हाय' पासून सोनं अजूनही स्वस्त

सध्या सोन्याचे दर त्याच्या ₹१,७६,१२१ या 'ऑल टाइम हाय' पेक्षा सुमारे ₹२७,३०० ने खाली आले आहेत. चांदी देखील तिच्या सर्वोच्च स्तरापेक्षा बरीच खाली व्यवहार करत आहे. अलीकडील जागतिक तणावाच्या काळाचा विचार केल्यास, आतापर्यंत सोनं सुमारे ₹१०,२७६ आणि चांदी ₹२८,९८९ ने स्वस्त झाली आहे.

Web Title : 29 अप्रैल को सोने-चांदी की दरें: खरीदने से पहले नवीनतम दरें जांचें

Web Summary : 29 अप्रैल को विवाह के मौसम के बीच सोने और चांदी की कीमतों में उछाल आया। सोना ₹39 बढ़कर ₹1,48,821 प्रति 10 ग्राम हो गया; चांदी ₹2,370 बढ़कर ₹2,38,911 प्रति किलोग्राम हो गई। 22 कैरेट सोना जीएसटी को छोड़कर ₹1,36,320 प्रति 10 ग्राम पर पहुंच गया। फिर भी, सोना अपने सर्वकालिक उच्च स्तर से सस्ता है।

Web Title : Gold, Silver Prices Rise April 29: Check Latest Rates Before Buying

Web Summary : Gold and silver prices surged on April 29 amid wedding season. Gold rose by ₹39 to ₹1,48,821 per 10 grams; silver jumped ₹2,370 to ₹2,38,911 per kg. 22 Carat gold reached ₹1,36,320 per 10 grams excluding GST. Still, gold is cheaper than its all-time high.