Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?

Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?

Gold Silver Rate on MCX, 8 May 2026: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ८ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:15 IST2026-05-08T11:15:22+5:302026-05-08T11:15:22+5:30

Gold Silver Rate on MCX, 8 May 2026: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ८ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price Today Silver crosses Rs 260000 gold continues to rise From Mumbai to Delhi see what are the gold prices in major cities | Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?

Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?

Gold Silver Rate on MCX, 8 May 2026: मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर ८ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी सोन्याचा भाव १,५२,८६४ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,६०,६५० रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. मागील सत्रात सोनं १,५२,४६५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २,५९,७३८ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

सोने-चांदीच्या दरात आज किती मोठी उसळी?

गुरुवारच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत सुमारे ४०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीच्या किमतीत ९१२ रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात ही दरवाढ सामान्य खरेदीदारांसाठी चिंतेची बाब ठरत आहे, कारण अनेक ग्राहक अजूनही किमतीत मोठ्या घसरणीची प्रतीक्षा करत आहेत.

मध्य पूर्वेत सुरू झालेल्या तणावानंतर सोने-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून आला, परंतु जानेवारी महिन्यात किमतींनी आधीच मोठे विक्रम प्रस्थापित केले होते. त्यामुळे नंतर आलेल्या दबावामुळेही त्या वाढीवर फारसा परिणाम झाला नाही. आजही सोने-चांदीच्या किमती गेल्या वर्षाच्या तुलनेत उच्च पातळीवर आहेत. तसंच, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारांचा परिणाम कमोडिटी बाजारावर दिसून येत आहे.

आजचा चांदीचा भाव

गेल्या काही काळापासून सोन्याच्या तुलनेत चांदीच्या किमतीत मोठी अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कालही चांदीच्या दरात चांगली वाढ झाली होती आणि आज सोन्याच्या तुलनेत चांदीमधील तेजी अधिक मोठी आहे. विविध शहरांतील चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत:

दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू: २,७५,००० रुपये प्रति किलो.
चेन्नई: २,७४,९०० रुपये प्रति किलो.

काय आहेत सोन्याचे दर? (सोर्स - गुड रिटर्न)

शहर24 कॅरेट सोन्याचा भाव22 कॅरेट सोन्याचा भाव18 कॅरेट सोन्याचा भाव
दिल्ली1,40,1001,14,6601,14,660
मुंबई1,52,6801,39,9501,14,510
कोलकाता1,52,6801,39,9501,14,510
चेन्नई1,53,8401,41,0201,17,720
हैदराबाद1,52,6801,39,9501,14,510
भोपा1,52,7301,39,9501,14,560

Web Title : सोना, चांदी की कीमतों में उछाल; प्रमुख शहरों में आज के रेट देखें।

Web Summary : एमसीएक्स पर सोना और चांदी की कीमतों में तेजी आई। सोना ₹1,52,864 प्रति 10 ग्राम, चांदी ₹2,60,650 प्रति किलो तक पहुंची। शादी के मौसम में बढ़ी कीमतों से खरीदार चिंतित हैं। कच्चे तेल की कीमतों में उतार-चढ़ाव का असर कमोडिटी बाजार पर है; कीमतें पिछले साल से अधिक हैं।

Web Title : Gold, silver prices soar; check rates in major cities now.

Web Summary : Gold and silver prices surged on MCX. Gold reached ₹1,52,864 per 10 grams, silver ₹2,60,650 per kg. Increased prices concern buyers during wedding season. Crude oil fluctuations impact commodity markets; prices are higher than last year.