Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदीचे भाव कोसळले, नफा-वसुलीला आला जोर

सोने-चांदीचे भाव कोसळले, नफा-वसुलीला आला जोर

Gold and silver price News: गेल्या काही दिवसांपासून रोज नवा विक्रम करणाऱ्या सोने - चांदीच्या किमतीना शुक्रवारी अचानक मोठा ब्रेक लागला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव तब्बल १४,००० रुपयांनी कोसळला, तर चांदीच्या दरात २०,००० रुपयांची मोठी घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 07:51 IST2026-01-31T07:43:42+5:302026-01-31T07:51:03+5:30

Gold and silver price News: गेल्या काही दिवसांपासून रोज नवा विक्रम करणाऱ्या सोने - चांदीच्या किमतीना शुक्रवारी अचानक मोठा ब्रेक लागला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव तब्बल १४,००० रुपयांनी कोसळला, तर चांदीच्या दरात २०,००० रुपयांची मोठी घसरण झाली.

Gold and silver prices fall, profit-taking gains momentum | सोने-चांदीचे भाव कोसळले, नफा-वसुलीला आला जोर

सोने-चांदीचे भाव कोसळले, नफा-वसुलीला आला जोर

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांपासून रोज नवा विक्रम करणाऱ्या सोने - चांदीच्या किमतीना शुक्रवारी अचानक मोठा ब्रेक लागला. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव तब्बल १४,००० रुपयांनी कोसळला, तर चांदीच्या दरात २०,००० रुपयांची मोठी घसरण झाली. या अनपेक्षित पडझडीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी गुंतवणूकदारांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

विक्रमी उच्चांकावरून मोठी घसरण
गुरुवारी सोन्याने १,८३,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, शुक्रवारी ७.६५ टक्क्यांच्या घसरणीसह सोने १,६९,००० रुपयांवर (सर्व करांसह) स्थिरावले. चांदीची स्थितीही वेगळी नव्हती; गुरुवारी ४,०४,५०० रुपयांच्या शिखरावर पोहोचलेली चांदी शुक्रवारी ३,८४,५०० रुपये प्रतिकिलोवर आली.

आंतरराष्ट्रीय बाजारातही पडझड
जागतिक बाजारात स्पॉट सोन्याचा दर ५.३१ टक्क्यांनी घसरत ५,०८७.७३ डॉलर प्रति औंसवर आला. स्पॉट चांदीतही मोठी घसरण झाली. चांदी १२ टक्क्यांहून अधिक घसरून १०१.४७ डॉलर प्रतिऔंसवर आली. व्यवहारादरम्यान ती ९५.२६ डॉलरपर्यंत घसरली होती. 

सिल्व्हर ईटीएफला दणका
फंड     एका दिवसातील घसरण
एसबीआय सिल्व्हर ईटीएफ     २०.५०%
ॲक्सिस सिल्व्हर ईटीएफ     २०.१६%
आयसीआयसीआय ईटीएफ     २०.१४%
कोटक सिल्व्हर ईटीएफ     १९.७९%
डीएसपी सिल्व्हर ईटीएफ     १९.४८%

गोल्ड ईटीएफ कोसळले
फंड     एका दिवसातील घसरण
ॲक्सिस म्युच्युअल फंड     १२.५३%
युनियन गोल्ड ईटीएफ     ११.८९%
३६० वन गोल्ड ईटीएफ     ११.४३%
कोटक गोल्ड एक्सचेंज फंड     ११.२३%
डीएसपी गोल्ड ईटीएफ     १०.५५%

का कोसळले भाव?
नफेखोरीचा सपाटा : मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा पदरात पाडून घेण्यासाठी विक्री केली.
डॉलरचा जोर : जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर पुन्हा वधारल्याने त्याचा थेट फटका सोने-चांदीला बसला.
अमेरिकेतील राजकीय घडामोडी :  सरकारी कामकाज ठप्प होण्याचे संकट टळल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्यांचा कल घटला.
फेडरल रिझर्व्हचे नवे नेतृत्व : प्रमुखपदी केविन वॉर्श यांच्या नियुक्तीमुळे आगामी काळात व्याजदर बदलण्याची भीती.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में भारी गिरावट, मुनाफावसूली हावी

Web Summary : मुनाफावसूली और डॉलर की मजबूती के कारण सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। दिल्ली के सराफा बाजार में सोना ₹14,000 और चांदी ₹20,000 तक गिरी। वैश्विक बाजारों में भी गिरावट देखी गई, जिससे गोल्ड और सिल्वर ईटीएफ प्रभावित हुए। अचानक गिरावट से निवेशक परेशान हैं।

Web Title : Gold and Silver Prices Plunge, Profit-Booking Triggers Sell-Off

Web Summary : Gold and silver prices witnessed a sharp decline due to profit-taking and a stronger dollar. Gold fell by ₹14,000, and silver plummeted by ₹20,000 in Delhi's bullion market. Global markets also saw significant drops, impacting gold and silver ETFs. Investors are rattled by the sudden drop.