Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > झोमॅटो-स्विगीची मक्तेदारी संपणार? फ्लिपकार्टचा 'फूड डिलिव्हरी'मध्ये धमाका; 'या' शहरातून होणार सुरुवात

झोमॅटो-स्विगीची मक्तेदारी संपणार? फ्लिपकार्टचा 'फूड डिलिव्हरी'मध्ये धमाका; 'या' शहरातून होणार सुरुवात

Flipkart Food : वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आता भारतातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:27 IST2026-02-12T15:15:44+5:302026-02-12T16:27:54+5:30

Flipkart Food : वॉलमार्टच्या मालकीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आता भारतातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे.

Flipkart to Enter Online Food Delivery Market Set to Rival Zomato and Swiggy | झोमॅटो-स्विगीची मक्तेदारी संपणार? फ्लिपकार्टचा 'फूड डिलिव्हरी'मध्ये धमाका; 'या' शहरातून होणार सुरुवात

झोमॅटो-स्विगीची मक्तेदारी संपणार? फ्लिपकार्टचा 'फूड डिलिव्हरी'मध्ये धमाका; 'या' शहरातून होणार सुरुवात

Flipkart Food : भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट आता तुम्हाला घरपोच जेवण पोहचवणार आहे. झोमॅटो आणि स्विगी या दोन बड्या कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या 'ऑनलाइन फूड डिलिव्हरी' बाजारपेठेत फ्लिपकार्ट लवकरच एन्ट्री करणार आहे. मे-जून महिन्यात बेंगळुरूमध्ये या सेवेचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार असून, २०२६ च्या अखेरीस ही सेवा देशभरात विस्तारण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

फ्लिपकार्टचा दुसरा प्रयत्न; रणनीती बदलली!
दोन वर्षांपूर्वी फ्लिपकार्टने 'ONDC' (Open Network for Digital Commerce) च्या माध्यमातून या क्षेत्रात येण्याचा विचार केला होता, मात्र तो यशस्वी झाला नाही. आता कंपनी स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरून थेट फूड डिलिव्हरी सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे आणि ग्राहकांच्या गरजांमुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

का वाढतेय फूड डिलिव्हरीची ओढ?

  • भारताची फूड डिलिव्हरी मार्केट २०२५ मधील ९ अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत २५ अब्ज डॉलरवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
  • ई-कॉमर्समधील खरेदी अधूनमधून होते, पण जेवण ऑर्डर करणे ही लोकांची रोजची गरज बनली आहे. यामुळे फ्लिपकार्टच्या ॲपवर ग्राहकांची वर्दळ वाढेल.
  • फ्लिपकार्टकडे आधीच करोडो ग्राहक आहेत, त्यांना नवीन सेवेशी जोडणे कंपनीसाठी सोपे जाईल.

फ्लिपकार्टचे 'बळ' काय?
फ्लिपकार्ट सध्या आपल्या क्विक कॉमर्स सेवेअंतर्गत ८०० हून अधिक 'डार्क स्टोअर्स' चालवत आहे. कंपनीचे वितरण जाळे अत्यंत भक्कम आहे, ज्याचा फायदा गरम अन्न वेळेवर पोहोचवण्यासाठी होईल. फ्लिपकार्ट लवकरच आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी आपला व्यवसाय विस्तारणे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल.

वाचा - टाटा ट्रस्ट्समध्ये पुन्हा अंतर्गत संघर्ष? मेहली मिस्त्रींच्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण; कॉर्पोरेट विश्वात खळबळ

झोमॅटो आणि स्विगीसमोर मोठे आव्हान
सध्या भारतीय बाजारपेठ या दोन कंपन्यांच्या हातात आहे. फ्लिपकार्टकडे स्वतःचे मोठे रेस्टॉरंट नेटवर्क आणि मायक्रो-वेअरहाऊस सुविधा असल्याने झोमॅटो-स्विगीच्या वर्चस्वाला तडा जाण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना सवलती आणि दर्जेदार सेवा मिळण्याची चिन्हे आहेत.

Web Title : फ्लिपकार्ट की ज़ोमैटो-स्विगी को चुनौती: बेंगलुरु में जल्द फूड डिलीवरी सेवा।

Web Summary : फ्लिपकार्ट ने ज़ोमैटो और स्विगी को चुनौती देते हुए फूड डिलीवरी बाजार में प्रवेश किया। बेंगलुरु में लॉन्चिंग, 2026 तक पूरे देश में विस्तार की योजना है। मौजूदा ढांचे और ग्राहक आधार का लाभ उठाते हुए, फ्लिपकार्ट का लक्ष्य प्रतिस्पर्धी मूल्य निर्धारण और बेहतर सेवा प्रदान करके एकाधिकार को तोड़ना है।

Web Title : Flipkart challenges Zomato-Swiggy: Food delivery service launching soon in Bengaluru.

Web Summary : Flipkart enters the food delivery market, challenging Zomato and Swiggy. Launching in Bengaluru, with plans for nationwide expansion by 2026. Leveraging its existing infrastructure and customer base, Flipkart aims to disrupt the duopoly by offering competitive pricing and improved service.