Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅपद्वारे ४००० जणांची लूट! ७९२ कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी CID ची मोठी कारवाई; कशी होती स्कीम?

अ‍ॅपद्वारे ४००० जणांची लूट! ७९२ कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी CID ची मोठी कारवाई; कशी होती स्कीम?

Falcon Group Ex-COO Arrested: तेलंगणा गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ७९२ कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी फाल्कन ग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) विकास कुमार साखरे यांना अटक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:40 IST2026-02-26T13:33:51+5:302026-02-26T13:40:15+5:30

Falcon Group Ex-COO Arrested: तेलंगणा गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ७९२ कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी फाल्कन ग्रुपचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) विकास कुमार साखरे यांना अटक केली आहे.

Falcon Invoice Discounting App Fraud Over 4,000 Investors Cheated of ₹792 Crores | अ‍ॅपद्वारे ४००० जणांची लूट! ७९२ कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी CID ची मोठी कारवाई; कशी होती स्कीम?

अ‍ॅपद्वारे ४००० जणांची लूट! ७९२ कोटींच्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी CID ची मोठी कारवाई; कशी होती स्कीम?

Falcon Group Fraud :तेलंगणा राज्यातील एका मोठ्या गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. सुमारे ७९२ कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात 'फॅल्कन ग्रुप'चा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास कुमार सखारे याला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबाद येथील राहत्या घरातून त्याला बुधवारी ताब्यात घेण्यात आले.

'फॅल्कन अ‍ॅप'च्या नावाखाली फसवणुकीचे जाळे
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, 'कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीने “Falcon Invoice Discounting” नावाचे एक मोबाईल अ‍ॅप तयार केले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून गुंतवणूदारांना आकर्षित करण्यासाठी खालील पद्धती वापरल्या गेल्या.
बनावट व्यवहार : मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने बनावट डील्स अ‍ॅपवर दाखवण्यात आल्या, ज्यामुळे गुंतवणूदारांचा विश्वास बसला.
जादा परताव्याचे आमिष : सोशल मीडिया जाहिराती आणि टेलि-कॉलरच्या मदतीने गुंतवणूदारांना भरघोस व्याजाचे आमिष दाखवण्यात आले.
आकडेवारी : या योजनेतून ७,०५६ गुंतवणूदारांकडून तब्बल ४,२१५ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यापैकी ४,०६५ गुंतवणूदारांचे सुमारे ७९२ कोटी रुपये बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोंझी स्कीमचा वापर आणि कार्यालयाला टाळे
सीआयडीच्या अतिरिक्त महासंचालक चारू सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून सुरू झालेली ही योजना हळूहळू 'पोंझी स्कीम'मध्ये रूपांतरित झाली. यामध्ये नवीन गुंतवणूदारांकडून घेतलेले पैसे जुन्या गुंतवणूदारांना परतावा म्हणून दिले जात होते. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये कंपनीने परतावा देणे अचानक बंद केले आणि हैदराबादमधील त्यांचे मुख्य कार्यालयही बंद झाले. यामुळे हवालदिल झालेल्या गुंतवणूदारांनी पोलिसांत धाव घेतली.

वाचा - इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

तपासाची व्याप्ती वाढणार
सुरुवातीला हा गुन्हा सायबराबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत नोंदवण्यात आला होता, परंतु व्याप्ती मोठी असल्याने तो सीआयडीकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात विकास सखारे याने मुख्य आरोपींना गुंतवणूदारांशी जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

Web Title : ऐप से 4000 लोगों को लूटा: 792 करोड़ के घोटाले में CID की कार्रवाई

Web Summary : सीआईडी ने 'फाल्कन ऐप' के जरिए 792 करोड़ के घोटाले में फाल्कन ग्रुप के पूर्व सीईओ को गिरफ्तार किया। ऐप ने निवेशकों को भारी रिटर्न और नकली सौदों का लालच दिया, जो पोंजी स्कीम के रूप में काम कर रहा था। अन्य फरार आरोपियों की तलाश जारी है।

Web Title : App-Based Investment Scam: CID Arrests Key Accused in 792 Crore Fraud

Web Summary : CID arrested Falcon Group's ex-CEO for a 792 crore scam via the 'Falcon App'. The app lured investors with high returns and fake deals, operating as a Ponzi scheme. Investigations continue to nab other absconding accused.