lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक जाणकार निकालांबाबत आपली मते मांडत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:04 PM2024-03-20T22:04:36+5:302024-03-20T22:05:27+5:30

भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक जाणकार निकालांबाबत आपली मते मांडत आहेत.

BJP, NDA or INDIA; How will the country's economy be after whose government comes, see... | BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

Indian Economy: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यासोबतच आदर्श आचारसंहिता (MCC) देखील लागू झाली आहे. देशभरात सात टप्प्यात मतदान होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होईल. या निकालाचा शेअर बाजार आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येईल. दरम्यान, ब्रोकरेज फर्म यूबीएसने निवडणुकीच्या निकालाचा अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावर काय परिणाम होईल, यावर आपली मते शेअर केली आहेत.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर..?
मीडिया रिपोर्टनुसार, परदेशी ब्रोकरेज फर्म यूबीएसने म्हटले की, अनेक ओपिनियन पोल भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विजयाचा अंदाज व्यक्त करत आहेत. यूबीएसने म्हटले की, जर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, तर त्यांच्या धोरणावर लक्ष केंद्रित करेल आणि ही खासगी क्षेत्रासाठी हे चांगली चिन्ह ठरू शकते. याशिवाय, एनर्जी, पायाभूत सुविधा, उत्पादन, तरुण, गरीब, महिला, शेतकरी यासह इतर क्षेत्रांमध्ये प्रगती साधली जाऊ शकते.

युती करुन भाजप सत्तेत आल्यास काय होईल?
दुसऱ्या परिस्थिती, भाजपच्या जागा कमी आल्या आणि त्यांना मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करावी लागली, तर काही धोरणे रोखली जाऊ शकतात. UBS ने सांगितले की निर्गुंतवणूक, समान नागरी संहिता यासह काही कठोर धोरणांवर स्थगिती येण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीची सत्ता आल्यास काय होईल?
तिसऱ्या परिस्थितीत, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करून इंडिया आघाडी सत्तेवर आली तर त्याचा शेअर बाजारावर तात्काळ तीव्र परिणाम दिसेल. तर, भविष्यात अर्थव्यवस्थेमध्येही काही बदल घडू शकतात. 

उल्लेखनीय बाब म्हणजे, यूबीएसने गेल्या चार निवडणुकांचे विश्लेषण करुन असा निष्कर्ष काढला की, मोदी सरकार आपला जाहीरनामा पूर्ण करण्यात काँग्रेसपेक्षा चांगले आहे. मोदी सरकारने सामाजिक कल्याणकारी योजनांसोबत आर्थिक सुधारणांचा समतोल साधण्यावर भर दिला आहे.

 

Web Title: BJP, NDA or INDIA; How will the country's economy be after whose government comes, see...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.