Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रतन टाटांच्या आणखी एका विश्वासू साथीदाराने टाटा ट्रस्ट सोडली, प्रमित झावेरी यांचा फेरनियुक्तीस नकार

रतन टाटांच्या आणखी एका विश्वासू साथीदाराने टाटा ट्रस्ट सोडली, प्रमित झावेरी यांचा फेरनियुक्तीस नकार

रतन टाटा यांचे जवळचे सहकारी प्रमित झावेरी यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. नोएल टाटांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ११ फेब्रुवारीला पद सोडणार असल्याचे स्पष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:56 IST2026-01-31T16:55:35+5:302026-01-31T16:56:12+5:30

रतन टाटा यांचे जवळचे सहकारी प्रमित झावेरी यांनी सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिला आहे. नोएल टाटांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी ११ फेब्रुवारीला पद सोडणार असल्याचे स्पष्ट केले.

Another trusted ally of Ratan Tata leaves Tata Trusts, Pramit Zaveri refuses to be reappointed | रतन टाटांच्या आणखी एका विश्वासू साथीदाराने टाटा ट्रस्ट सोडली, प्रमित झावेरी यांचा फेरनियुक्तीस नकार

रतन टाटांच्या आणखी एका विश्वासू साथीदाराने टाटा ट्रस्ट सोडली, प्रमित झावेरी यांचा फेरनियुक्तीस नकार

टाटा समूहाची परोपकारी संस्था असलेल्या 'टाटा ट्रस्ट्स'मध्ये  मोठे प्रशासकीय बदल पाहायला मिळत आहेत. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणारे प्रमित झावेरी यांनी 'सर दोराबजी टाटा ट्रस्ट'च्या विश्वस्त पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. झावेरी यांचा सध्याचा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत असून, त्यांनी फेरनियुक्तीस नकार दिला आहे.

प्रमित झावेरी यांनी टाटा ट्रस्ट्सचे विद्यमान अध्यक्ष नोएल टाटा यांना ३१ जानेवारी रोजी औपचारिक पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली. "माझा सध्याचा कार्यकाळ ११ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे आणि त्यानंतर मी पुन्हा विश्वस्त म्हणून काम पाहू इच्छित नाही," असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. या संदर्भात त्यांनी नोएल टाटांशी आधीच चर्चा केली होती, असेही समजते.

रतन टाटांनी दिली होती जबाबदारी
प्रमित झावेरी हे सिटी बँकेचे माजी प्रमुख असून त्यांना आर्थिक क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. १२ फेब्रुवारी २०२० रोजी दिवंगत रतन टाटा यांनी स्वतः त्यांची नियुक्ती टाटा ट्रस्ट्सच्या बोर्डावर केली होती. टाटा समूहातील महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि परोपकारी कामांमध्ये झावेरी यांचा मोठा वाटा राहिला आहे.

टाटा संसवर ताबा आणि महत्त्व
'सर दोराबजी टाटा ट्रस्ट' ही टाटा समूहातील एक प्रमुख संस्था आहे. 'सर रतन टाटा ट्रस्ट' आणि 'सर दोराबजी टाटा ट्रस्ट' मिळून टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या 'टाटा संस'मध्ये ५१ टक्क्यांहून अधिक हिस्सा राखतात. त्यामुळे या बोर्डावरील बदल समूहाच्या भविष्यातील धोरणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

Web Title : रतन टाटा के एक और विश्वासपात्र प्रमित झावेरी ने टाटा ट्रस्ट छोड़ी

Web Summary : रतन टाटा के करीबी सहयोगी प्रमित झावेरी ने सर दोराबजी टाटा ट्रस्ट के बोर्ड से पुनर्नियुक्ति से इनकार कर दिया। उनका कार्यकाल 2026 में समाप्त हो रहा है। इस बदलाव का टाटा संस पर असर पड़ेगा, जहाँ ट्रस्ट की बहुमत हिस्सेदारी है।

Web Title : Another Ratan Tata Confidant, Pramit Jhaveri, Quits Tata Trusts

Web Summary : Pramit Jhaveri, a close aide to Ratan Tata, declined reappointment to Sir Dorabji Tata Trust after serving on the board since 2020. His current term ends in 2026. This change impacts Tata Sons, where the trust holds a majority stake.