Lok Sabha Election 2019 : Social media war between 'Yuti' and 'Aaghadi' | Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’!
Lok Sabha Election 2019 : युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’!

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीतीलफेसबुक व व्हॉट्स अ‍ॅपवर प्रचाराचा धुराळा चांगला उडत आहे. एकमेकांच्या सभेतील गर्दी, रिकाम्या खुर्च्या व विडंबनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये रेस लागली आहे. त्यामुळे युती व आघाडीत ‘सोशल मीडिया वॉर’ सध्या रंगात आलेले दिसून येत आहे. त्यात उमेदवारांचे वेगवेगळ्या नावाने काढलेल्या फेसबुक अकांऊटची संख्याही वाढली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या नावाने आठ ते दहा फेसबुक अकाऊंट उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्रतापराव जाधव, शिवसेना बुलडाणा जिल्ह्या, माझी गर्जना शिवसेना व इतर वेगवेगळ्या नावाने फेसबुकवर अकाउंट आहेत. यामध्ये एका अकाऊंटचे फॉलोअर्स १ हजार ते १२०० च्या घरात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे १० ते १५ फेसबुक अकाऊंट आहेत. त्यात फॉलोअर्सची संख्या १० हजारच्या आसपास आहे. दोन्ही उमेदवारांच्या फेसबुक अकाऊंटवरून सध्या प्रचाराचा धुराळा उडत आहे. व्हॉट्स अ‍ॅप गृ्रपचा युती व आघाडीच्या दोन्ही उमेदवारांकडून प्रभावीपणे वापर सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह मतदानासाठी जनजागृती करून पक्षाचा संदेश पोहचविण्यासाठी ‘वॉर रूम’चे गठण करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाकडून प्राप्त संदेश कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुखांपर्यंत पोहचवून त्यांची अंमलबजावणी करण्याची कसरत सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे.
सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या या फुशारक्या अ‍ॅन्टी प्रचाराचे एक माध्यम झाले आहे. भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळवून आपले नेते किती भारी याचा पुरेपूर देखावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर कुणाच्या सभेत किती खुर्च्या खाली, कुणाच्या सभेत किती गर्दी झाली यावर कार्यकर्त्यांच्या फुशारक्या मारणे सुरू आहे.
अशी चालते यंत्रणा
युती व आघाडीच्या दोन्ही उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर केला जात आहे.
‘मी आहे, मतदार, माझा ....... हा आहे खासदार’ असे मतदारांचे फोटो टाकून संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे काम कार्यकर्त्यांकडून सुरू आहेत.
सकाळी ८ वाजेपासून रात्री १२ ते १ वाजेपर्यंत हे काम चालू असते. या चमुकडे जिल्ह्यातील मतदारांचा डेटा तयार असून दररोज व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून त्यांना संदेश पाठविण्यात येतात.
प्रदेश स्तरावरून नेते, विद्यमान उमेदवारांची भाषणे जिल्हास्तरीय सभांची माहिती व्हायरल केली जात आहे. शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी यासाठी १२ कार्यकर्ते नियुक्त केले आहेत.

विडंबनाचे व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या विराधी पक्षाचे विडंबन करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. विरोधाकांच्या नेत्याचे भाषणाचा व्हिडीओवर एखाद्या चित्रपटाचा डायलॉग लावून त्याला व्हॉट्स अ‍ॅप ग्रृपवर फिरवले जात असल्याचे दिसून येते.


Web Title: Lok Sabha Election 2019 : Social media war between 'Yuti' and 'Aaghadi'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.