ठळक मुद्देजोया मार्च मध्ये जयपूरला गेली होती तर शजा श्रीलंकेला गेली होती. जोयाला सध्या सर्दी झाली आहे तर शजा एकदम व्यवस्थित आहे. दोघींनी देखील कोरोनाची टेस्ट केली असून शजाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून जोयाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे. आता एका बॉलिवूड निर्मात्याची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. 'रा वन' आणि चेन्नई एक्सप्रेस यासारख्या सिनेमांची निर्मिती केलेल्या करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी हिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 31 वर्षीय शजावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, आता शजानंतर तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री जोया मोरानीला देखील कोकीळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करीम मोरानी यांच्या भावाने स्पॉटबॉयने दिलेल्या मुलाखतीनुसार, जोया मार्च मध्ये जयपूरला गेली होती तर शजा श्रीलंकेला गेली होती. जोयाला सध्या सर्दी झाली आहे तर शजा एकदम व्यवस्थित आहे. दोघींनी देखील कोरोनाची टेस्ट केली असून शजाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून जोयाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पण तरीही जोयाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोरानी जुहूमध्ये राहत असून महापालिका कर्मचारी लवकरच त्यांच्या घराला सॅनिटाईज करणार आहेत. रिपोर्टनुसार मोरानी यांचं घर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या बिल्डिंगमध्ये एकूण नऊ लोक राहतात. त्या सगळ्यांची देखील टेस्ट करण्यात आली आहे. 

मोरानी हे बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहेत. शाहरुख खानसोबत त्यांची चांगली मैत्री आहे. शाहरुखच्या अनेक सिनेमांचे ते निर्माते आहेत. 2015 मध्ये आलेल्या 'दिलवाले' सिनेमाची निर्मिती देखील त्यांनी केली होती. 

Web Title: Zoa Morani hospitalised for showing symptoms of COVID - 19 PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.