बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिडसची सर्वात जास्त चर्चा आहे. यातच आणखीन एका स्टारकिडसची भर पडली आहे. अभिनेत्री पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला बॉलिवूडमध्ये 'जवानी जानेमन' सिनेमातून डेब्यू करणार आहे. मात्र रूपेरी पडद्यावर झळकण्याआधीच तिचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. सिनेमात झळकण्यापूर्वीच तिची लोकप्रियता पाहता अभिनय क्षेत्रातही ती इतर स्टारकीडसप्रमाणे आपला जम बसवेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 


तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला तीन लाख ९२ हजारहून अधिक फॉलोअर्स असून सोशल मीडियावर तिचे अनेक फॅन पेजस आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच सिनेमात ती सैफ अली खानच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका साकरणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.  ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयाआधीच तिने आपले सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. 


सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. मुळात आलिया रिअल लाइफमध्येही तेवढीच हॉट आणि बोल्ड आहे. त्यामुळेच पदार्पणाआधीच ती सोशल मीडियावर चर्चेत असते.


तुर्तास  'जवानी जानेमन' सिनेमाचा ट्रेलरमध्ये सैफचा एक वेगळाच स्वॅग यात दिसत आहे. मात्र जेव्हा त्याच्या 21 वर्षांची मुलगी समोर येते तेव्हा त्याच्या आयुष्यात एक ट्विस्ट येतो. या सिनेमात तब्बू सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे, जरी ती बर्‍याच वर्षांपासून त्याच्यापासून दूर राहत होती.

पण त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी दोघांची मुलगी घेते. त्यानंतर यांच्या आयुष्यात घडणा-या मेजशीर गोष्टींवर सिनेमा आधारित आहे. जवानी जानमेन सिनेमाची निर्मिती जॅकी भगनानीने केली आहे तर या सिनेमाचे दिग्दर्शन नितिन कक्कडने केले आहे. यात सैफ 40 वर्षांच्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.     


 

Web Title: You will be surprised seeing Saif's Onscreen Daughters Aalia Furniturewalla hot pics & the bollywood connections she has

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.