कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमुळेही चर्चेत असतात. लॉकडाऊन नंतर अभिनेत्री अदा शर्मा पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. अदा शर्माचे आणखीन काही फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  अदा शर्मा यावेळी  आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अतिशय अनोख्या गेटअपमध्ये आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.अगदी यावेळीही तिने असेच हटके फोटो शेअर केले आहे.  अदा शर्माच्या स्टाइलमध्ये आता मास्कचीही एंट्री झाली आहे. अनोख्या पद्धतीच्या मास्कनेच लक्ष वेधून घेतले आहे. अदा शर्माची  प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते. मात्र या लुकमध्ये तिच्या या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत.

 आजकाल फॅन्सी मास्कचा ट्रेंड प्रचंड सुरू आहे. अशा परिस्थितीत अदा शर्माची ही मास्क क्रिएटीव्हीटी चाहत्यांना प्रभावित करू शकते. फोटोत दिसतअसल्याप्रमाणे अदा रेड आउटफिटमध्ये दिसत आहे. हातात एक टेडी मांजरही दिसत आहे. 2008मध्ये अदाने 1920 सिनेमामधून पदार्पण केले होते.  यानंतर 'हम है राही यार' के आणि 'हंसी तो फंसी' या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या आहेत. 'कमांडो-२' या सिनेमातही अदा झळकली होती .

विशेष म्हणजे लॉकडाऊन दरम्यानही तिच्या एका व्हिडीओने धुमाकुळ घातला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरलही झाला होता. व्हिडीओमध्ये ती घरकाम करण्यात बिझी आहे. घराची गच्चीची साफ सफाई करताना ती दिसते. यात तिचा देसी अंदाज पाहायला मिळतोय. चक्क साडी तिने परिधान केली आहे. गच्ची साफ करता -करता अदा अचानक स्टंट करू लागते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच अनेकजण कौतुक करत लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत.


मध्यंतरी माकडांसोबतही गप्पा मारतानाच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ती माकडांसोबत इंग्रजीमध्ये बोलत होती. हे पाहून अनेकांना हसू आवरले नाही. म्हणून नेटीझन्सने तिला चांगलेच ट्रोल केले होते. इतकेच नाही तर यापूर्वीही तिने भींतीला लटकत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. विस्कटलेले केस, भिंतीवर लटकलेली अदाला पाहून अनेकांनी तिने असे का केले असावे असा प्रश्न निर्माण झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: you will be amazed to see Adah Sharma Photo trending caused by masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.