करिअर फ्लॉप ठरले तरीही फरदीन खान आहे कोट्यधीश, संपत्तीचा आकडा जाणून वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 05:48 PM2021-09-15T17:48:59+5:302021-09-15T17:54:22+5:30

गेल्या दहा वर्षांमध्ये फरदीन एकाही सिनेमात दिसला नाही.त्यामुळे फरदीनची जादूही कमी झाली. चाहत्यांच्याही तो विस्मृतीत गेला.

You Will Be Amazed To Know Fardeen Khan Property Details, Check Here | करिअर फ्लॉप ठरले तरीही फरदीन खान आहे कोट्यधीश, संपत्तीचा आकडा जाणून वाटेल आश्चर्य

करिअर फ्लॉप ठरले तरीही फरदीन खान आहे कोट्यधीश, संपत्तीचा आकडा जाणून वाटेल आश्चर्य

Next

बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत. ज्यांना सुरुवातीला प्रचंड यश मिळतं. पण काही सिनेमात झळकल्यानंतर ते अचानक गायब होतात. त्यांचे रुपेरी पडद्यावर दर्शनही होत नाही. अशाच कलाकारांच्या यादीत फरदीन खानही गणला जातो. मध्यंतरी जेव्हा तो चर्चेत आला तेव्हा त्याच्या लूकमुळे चर्चेत आला होता. त्याचे वाढलेले वजन, बदलेलला अंदाज पाहून चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते.

बॉलिवूडपासून दुरावलेल्या फरदीनचा अवतार पाहून त्याच्यावर प्रचंड चर्चा रंगली होती.बॉलिवूडमध्ये काही सिनेमे सोडले तर फारशा संधी मिळाल्या नाही. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांचा फरदीन खान हा मुलगा असूनही इंडस्ट्रीमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये फरदीन एकाही सिनेमात दिसला नाही.त्यामुळे फरदीनची जादूही कमी झाली. चाहत्यांच्याही तो विस्मृतीत गेला.अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे फरदीनचं करिअर संपल्याचे बोलले जाते. फरदीनला काही काळासाठी रिहॅब सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते.

फरदीन कोणत्याही सिनेमात झळकत नसला तरी आज त्याच्याकडे कोट्याधीश आहे. फरदीनकडे आज  40 मिलियन डॉलर म्हणजचे जवळपास 296 कोटींची प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे. ही प्रॉपर्टी फरदीनने कमावलेली नसून त्याचे वडिल फिरोज खान यांची आहे.  

वडिलांची संपत्ती तो सांभाळत आहे.याचबरोबर  फिरोज खान यांची बंगळुरू येथे १०० एकरपेक्षाही जास्त जमीन आहे. तिथे त्यांचं एक फार्महाउसही आहे. गेल्या दहा वर्षापासून तो बॉलिवूडपासून दूर आहे. पण तरीही तो आलिशान आयुष्य जगतो.

फरदीनला लक्झरियस गाड्यांचाही शौकीन आहे. मर्सडीज बेंज एस-500, ऑडी क्यू7 सारख्या महागड्या गाड्यांचे कलेक्शनही त्याच्याकडे आहे.या गाड्यांची किंमतही जवळपास २ कोटींपर्यंत आहे. २०१३ मध्ये फरदीनची मर्सडीज बेंज एस-500 कार जुहूच्या एका हॉटेलच्या बाहेर कित्येक महिने धुळ खात पडून होती. त्यावेळी त्याची प्रचंड चर्चा झाली होती.  

फरदीनने मुमताजची मुलगी नताशासह  डिसेंबर 2005मध्ये लग्न केले आहे.फरदीनला दोन मुलं आहेत. मुलीचे नाव  इसाबेल आणि मुलाचे नाव अजारियस आहे. कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना तो दिसतो. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You Will Be Amazed To Know Fardeen Khan Property Details, Check Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app